MlA Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Maratha Reservation : 'सह्याद्री'वर सर्वपक्षीय बैठक सुरू असताना मंत्रालयाला ठोकलं टाळं

All Party Meeting : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली.

Swapnil Shinde

Maharashtra Politics : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपासून या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना देखील समोर आल्या आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. एकीकडे चर्चा सुरू असताना सर्वपक्षीय आमदारांनी मंत्रालयाला टाळे ठोकले.

या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत विविध पक्षांची भूमिका जाणून घेतली गेली. त्याचबरोबर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने राज्य शासनाकडे सादर केलेला प्राथमिक अहवाल चर्चा करण्यात आली.

दुसरीकडे मंत्रालयाबाहेर राष्ट्रवादीतील आमदार निलेश लंके, शिवसेना ठाकरे गटाचे आ. कैलास पाटील आणि आ. राजू पाटील यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले. आजही या शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार) आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मंत्रालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत मंत्रालयाचे कामकाज होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यांनी मंत्रालयाच्या पायाऱ्यांवरच ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी या आमदारांना ताब्यात घेतले. त्यामुळे मंत्रालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizers Crisis: खतबाजारात खदखद

Strait of Hormuz Crisis: ‘होर्मूझ’मधील पाणसुरुंग हटविण्यास सहा महिने लागण्याची शक्यता

BT Cotton Seed Price: बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार ‘जैसे थे’

Maharashtra Weather Forecast: उन्हाचा चटका वाढणार; पावसाचीही शक्यता

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

SCROLL FOR NEXT