Rajaram Sakhar Karkhana agrowon
ॲग्रो विशेष

Rajaram Sakhar Karkhana : 'राजाराम' एमडी मारहाण प्रकरण, जिल्ह्यातील सर्व कार्यकारी संचालकांचा काम बंदचा इशारा

MD Beaten Case : प्रकाश चिटणीस यांना झालेल्या माराहाणीचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोशिएशनने निषेध केला आहे.

sandeep Shirguppe

Rajaram Sugar Factory : कोल्हापूर कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना झालेल्या माराहाणीचा महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोशिएशनने निषेध केला आहे. संबंधितांवर कडक कारवाई करावी, अन्यथा राज्यातील सर्व कार्यकारी संचालक काम बंद आंदोलन करतील, असा इशारा साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रातील सर्वच साखर कारखान्यात कार्यरत असलेले कार्यकारी संचालक हे शासनाच्या पॅनेलवरील असतात. हे पद अत्यंत महत्वाचे व सन्मानाचे आहे. कारखान्यातील हजारो कर्मचारी, तेवढेच तोडणी मजूर, वाहतूकदार, लाखो ऊस उत्पादक, शेकडो मालपुरवठादार कारखानदारीवर अवलंबून असतात.

कारखाना व्यवस्थापन, शासन व या लोकांतील महत्वाचा दुवा म्हणून कार्यकारी संचालक काम करत असतात. परंतु, अलिकडील काळात कार्यकारी संचालक या पदास कोणतेही सरंक्षण नसल्याने अत्यंत निंदनीय घटना घडत आहेत.

यामध्ये कार्यकारी संचालकांना शिवीगाळ करणे, ब्लॅकमेल करणे, दमदाटी, मारहाण करणे अशा अनेक घटना घडत आहेत. मंगळवारी (ता. २) राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामागे राजकीय कारण असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. अशा स्वरूपाने राजकीय सुडापोटी कार्यकारी संचालक यांना माराहाण करणे निंदनीय व खेदजनक आहे.

या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून याबाबत आपण संबंधितांवर तत्काळ कारवाईच्या सूचना देणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व कार्यकारी संचालक ज्यांनी आजपर्यंत कधीही संप, आंदोलन केलेले नाही, त्यांना काम बंद आंदोलन करून आपल्या कार्यालयासमोर न्याय मागणीसाठी उपोषण करावे लागेल. निवेदनावर असोशिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रणवरे, उपाध्यक्ष डॉ. यशवंत कुलकर्णी, सचिव संजीव देसाई यांच्या सह्या आहेत.

आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या दहशतीमुळे राजाराम कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्मचारी संघटनेने आज सकाळी काम बंद ठेवले. सतेज पाटील यांच्याविरोधात निदर्शने केली. तसेच काळ्या फिती लावून हल्ल्याच्या घटनेचा निषेध केला. संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी,' अशी मागणी कारखाना कर्मचारी संघटनेने केली. राजाराम कारखाना संचालक मंडळाच्या वतीने पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, सतेज पाटील गटाकडून आतापर्यंत तीन वेळा राजाराम कारखान्यावर दगडफेक आणि हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. कर्मचाऱ्यांना कसबा बावड्यातूनच कारखान्याकडे जावे लागते. यावेळी त्यांना धोका निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. संचालकांनाही धोका आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष नारायण चव्हाण, सत्यजित कदम, संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, मारुती किडगावकर, शिवाजी पाटील, दिलीप उलपे, विलास जाधव, नंदकुमार भोपळे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT