Rajaram Sugar Factory : महाडिक, सतेज पाटील गटाचा वाद विकोपाला, राजाराम कारखान्याच्या एमडींना थेट मारहाण

Farmers Beaten MD : संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे एमडी यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात केली.
Rajaram Sugar Factory
Rajaram Sugar Factoryagrowon
Published on
Updated on

Rajaram Sugar Factory Kolhapur : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याकडून विरोधी गटाच्या सभासदांचा ऊसच तोडून नेला जात नसल्याचा सतेज पाटील गटाकडून आरोप करण्यात येत आहे. दरम्यान याबाबत जाब विचारण्यासाठी राजर्षी छत्रपती परिवर्तन आघाडीच्यावतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू मार्केट यार्डातील प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या कार्यालयावर आज मंगळवारी (दि. २) धडक मोर्चा काढण्यात आला.

ही घटना ताजी असतानाच आज सायंकाळी कसबा बावडा परिसरातील काही संतप्त शेतकऱ्यांनी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे एमडी यांना काही कळण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात केली. यावेळी मागचा एक महिनाभर शेतकऱ्यांना चुकीची वागणूक दिल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. जमलेल्या शेतकऱ्यांनी वाहणावर लाथा मारल्या तर वाहनाचा दरवाजाही तोडला.

संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने परिसरात मोठी गर्दी जमली होती. दहा मिनिटे सुरू राहिलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी झाली. काहींनी मध्यस्थी करून कार्यकारी संचालक चिटणीस यांना पुन्हा गाडीत बसवले आणि त्यांची गाडी मार्गस्थ केली.

दरम्यान मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कारखान्याचे कार्यकारी संचालक आपले काम आटोपून कसबा बावडा मुख्य मार्गावरून जात असताना पाटील गल्ली समोर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवली.

Rajaram Sugar Factory
Rajaram Sahkari Sakhar : राजाराम साखर कारखान्यावरून सतेज पाटील पुन्हा मैदानात, विरोधात कारभार केल्याचा आरोप

सतेज पाटील काय म्हणाले

आजच्या घडीला जिल्ह्यात उसाची कमतरता आहे. रोज राजाराम कारखाना दोन तास बंद असतो. मात्र सभासदांचा ऊस कारखाना उचलत नाही. निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जात आहे. बी आर माने यांच्या पावतीसमोर विरोधक लिहिल्याचा आरोप यावेळी आमदार सतेज पाटील यांनी केला.

जे विरोधक आहेत त्यांचा ऊस घेऊन जायचं नाही असले षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी केले आहे. त्याचा निषेध करून साकुर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी आमदार पाटील यांनी केली. तीन वर्ष उस नेला नसल्यास पोटनिमानुसार सभासद व रद्द होते. विरोधक सभासद संपवण्याचा डाव सत्ताधारी आखत असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.

आठ दिवसात सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा सभासदांना घेऊन कारखान्यावर धडक देणार असल्याचा इशारा आमदार सतीश पाटील यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com