White Onion Agrowon
ॲग्रो विशेष

White Onion : अलिबागचा कांदा पुण्याच्या बाजारपेठेत

कांदा काढणीपासून कांद्याच्या माळा तयार करण्यापर्यंत अनेक कामे स्थानिकांना मिळत असल्‍याने अनेकांना रोजगाराचे साधन खुले होत आहे.

Team Agrowon

Alibag News : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे पीक (White Onion Crop) तयार असून वेगवेगळ्या बाजारांत विक्रीसाठी रवाना होऊ लागला आहे. कांद्याची माळ तयार करून बाजारात नेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरीस अलिबागचा पांढरा कांदा बाजारात (Onion Market) येण्यास सुरुवात होते. पुण्यातील बाजारपेठेत (Pune APMC Market) आतापर्यंत जवळपास तीन लाखांचा कांदा पाठविण्यात आल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

तालुक्यातील कार्ले, खंडाळे, वाडगाव, नेहुली, सागाव, तळवली, पोवेळे, रुळे या ठिकाणी पांढऱ्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हा कांदा चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्‍त असल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडून मोठी मागणी असते.

कांदा काढणीपासून कांद्याच्या माळा तयार करण्यापर्यंत अनेक कामे स्थानिकांना मिळत असल्‍याने अनेकांना रोजगाराचे साधन खुले होत आहे. जिल्ह्यामध्ये ३०० हेक्टर क्षेत्रामध्ये कांद्याची लागवड केली जाते.

त्यात अलिबाग तालुक्यातील २५० हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते असून दरवर्षी जवळपास २० लाखांची उलाढाल होते. गत वर्षी अवकाळी पावसामुळे कांदा बाजारात पंधरा दिवस उशिरा दाखल झाला होता.

परंतु यंदा पोषक वातावरण असल्याने कांद्याचे पीक लवकर तयार झाले आहे. महिनाभरापासून कांदा काढणीपासून माळा विणण्याचे काम वेगाने सुरू आहे. औषधी गुणधर्म असल्‍याने अलिबागच्या कांद्याला वेगवेगळ्या बाजारातून मागणी वाढत आहे.

सुरुवातीला कांद्याची माळ अडीचशे रुपयांनी विकली जात होती. मात्र पुरवठा वाढल्याने सध्या दोनशे रुपयांनी विकली जात आहे. काही व्यापारी अलिबागमध्ये येऊन कांदा खरेदी करीत आहेत.

तालुक्यातील कार्ले, खंडाळे परिसरांत पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. काढणीपासून त्याच्या माळा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १६ खंडी म्हणजे एक हजार ६०० कांद्याच्या माळा पुण्यात पाठवल्‍या आहेत. यंदा पोषक वातावरण असल्याने उत्‍पादन चांगले झाले आहे.
सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT