Sant Dnyaneshwar Maharaj Agrowon
ॲग्रो विशेष

Alandi Kartiki Ekadashi : आळंदीत उद्यापासून माउलींचा संजीवन समाधी सोहळा

Sanjeevan Samadhi Ceremony : शनिवारपासून (ता. २३) माउलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू होत आहे. मंगळवारी (ता. २६) कार्तिकी एकादशी, तर गुरुवारी (ता. २८) माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.

Team Agrowon

Alandi News : आळंदीच्या कार्तिकी एकादशीची आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याची वारकऱ्यांना ओढ लागली आहे. दरवर्षी लाखो वारकरी, भाविक हा सोहळा ‘याची देही याची डोळा’ अनुभवत असतात. शनिवारपासून (ता. २३) माउलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू होत आहे. मंगळवारी (ता. २६) कार्तिकी एकादशी, तर गुरुवारी (ता. २८) माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.

शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत बाळासाहेब पवार, हैवतबावा वंशज, प्रतिनिधी यांच्या तर्फे हैबतबाबांच्या पायरीचे पूजन होऊन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर मंगळवारी (ता. २६) कार्तिकी एकादशी अर्थात आळंदीची यात्रा आहे. या दिवशी रात्री साडेबारा ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रह्मवृंदांच्या वेदघोषात माउलींच्या समाधीवर अभिषेक व आरती होईल.

या वेळी दर्शनरांगेत उभे असलेल्या पहिल्या दांपत्याला महापूजेचा मान दिला जातो. दुपारी १ वाजता श्रींची नगरप्रदक्षिणा होणार आहे. बुधवारी (ता. २७) पहाटे साडेतीन ते चार या वेळेत खेडचे प्रांताधिकारी यांच्या हस्ते पूजा होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत रथ मिरवणूक, अर्थात रथोत्सव होईल.

मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री ११ ते १२ यादरम्यान, खिरापत पूजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना प्रसाद वाटप होणार आहे. गुरुवारी (ता. २८) माउलींचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा असून, सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत परंपरेप्रमाणे नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. दुपारी १२ ते १२.३० या वेळेत घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती होणार आहे.

एक डिसेंबरच्या रात्री साडेनऊ ते साडेबारा या वेळेत श्रींची छबीना मिरवणूक होणार आहे. सोहळ्यादरम्यान २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत माऊली मंदिरात दररोज अभिषेक, महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धूपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम परंपरेने वेळेनुसार होणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21 Installment : पीएम किसानच्या २१ हप्त्याची हप्त्याची तारीख ठरली; नोंदणीसाठी कृषी मंत्रालयाचे आवाहन

Sugarcane Rate Protest: कर्नाटकातील मुधोळमध्ये ऊसदर आंदोलनाचा भडका

Micro Irrigation: ‘सूक्ष्म सिंचन’साठी इंदापुरात मोहीम

Crop Processing Industry: पारंपरिक शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योगावर भर द्यावा: पाटील

Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहि‍णींना

SCROLL FOR NEXT