Electrons Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Akkalkot Market Committee Election : अक्कलकोट बाजार समितीला आर्थिक खाईत लोटणाऱ्यांना हद्दपार करा

Krishi Utpanna Bajar Samiti Election : सहकाराचे नाव घ्यायचे आणि आपल्या ताब्यात असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेत स्वतःचे आर्थिक हित साधत त्या संस्था डबघाईला आणल्याचा आरोप करीत या भस्मासुराला बाजार समिती निवडणुकीतून हद्दपार करा

Team Agrowon

Akkalkot Market Election : सहकाराचे नाव घ्यायचे आणि आपल्या ताब्यात असलेल्या प्रत्येक सहकारी संस्थेत स्वतःचे आर्थिक हित साधत त्या संस्था डबघाईला आणल्याचा आरोप करीत या भस्मासुराला बाजार समिती निवडणुकीतून (Akkalkot Market Committee Election) हद्दपार करा, असे आवाहन अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी व्यक्त केले.

अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सर्वपक्षीय आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन पाटील यांनी खत साठा, मुदत ठेव रक्कम यावरून गंभीर आरोप तत्कालीन सभापती व उपसभापती यांच्यावर केले. या उलट प्रशासक असताना मार्केट कमिटीला वीस लाख रुपयांचा नफा झाल्याचा दावा त्यांनी केला.

२०१० ते २०१५ या माझ्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात बाजार समितीत व्यापारी आणि मार्केट कमिटीच्यावतीने दर सोमवारी शेतकरी बांधवांना मोफत जेवणाची सोय केली गेली होती.

तसेच दुष्काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीस मान देऊन बासलेगाव, हंजगी व सांगवी या तलावातून गाळ काढण्यास मदत केली गेली. त्याचप्रमाणे २००० लोकसंख्येपेक्षा मोठ्या गावात सिमेंटच्या टाक्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून भेट दिल्या गेल्या.

बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच हमीभाव केंद्र सलग चार वर्षे सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, हरभरा व मका इत्यादी पिकांना आमच्या कार्यकाळात योग्य दर दिला गेला.

याशिवाय केंद्र शासनाच्या मदतीने बाजार समितीत एकूण ४००० टन क्षमतेची दोन गोदाम धान्य साठवण्यासाठी बांधली गेली. तसेच ८० टन वजन करता येईल इतके क्षमतेचे वेब ब्रिज तयार केले गेले.

शेतकऱ्यांना मोफत बी बियाण्याचे वाटप करण्यात आले सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, व्यापारी व हमाल तोलार बांधवांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन मल्लिकार्जुन पाटील यांनी केले.

या पत्रकार परिषदेस दत्ता शिंदे, आंनद तानवडे, मल्लिकार्जुन काटगाव, संजय देशमुख, तुकाराम बिराजदार, शिवयोगी लाळसंगी, व्यंकट मोरे, बसवराज तानवडे, लाला राठोड, रामचंद्र अरवत, सुरेश गड्डी, कपिल शिंदे आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT