Pune News: राज्य मंत्रिमंडळाच्या आज (ता.१८) झालेल्या बैठकीला शिवसेना (शिंदे गट) पक्षातील बहुतांश मंत्र्यांनी जाणीवपूर्वक दांडी मारली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच या बैठकीला हजर होते. ‘ऑपरेशन लोटस’, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपाच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे आणि निधी वाटपातील भेदभावामुळे ही नाराजी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र ही नाराजी फेटाळून लावली असून, अनेक मंत्री निवडणुकीच्या कामासाठी बाहेर असल्याचे कारण दिले आहे..मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सुनावले…सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या मंत्र्यांनी ही बैठक जाणीवपूर्वक टाळली. बैठकीनंतर लगेचच हे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचले आणि त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांना कठोर शब्दांत सुनावले असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशी नाराजी मंत्रिमंडळ बैठकीत येऊ नये, अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी घेतली..Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार.याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण 'ऑपरेशन लोटस' म्हणजे भाजपाकडून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पक्षात ओढण्याच्या प्रयत्नांमुळे ही नाराजी निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः कल्याण-डोंबिवली भागात असे काही प्रकार घडल्याने शिंदे गटातील मंत्री संतापले आहेत..Maharashtra Politics: शतप्रतिशत भाजप.ऑपरेशन लोटससहित अनेक कारणे…याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाने अनेक ठिकाणी स्वबळावर लढण्याचा नारा दिल्यानेही शिवसेनेत असंतोष वाढला आहे. विकासकामांसाठी निधी वाटपातही भेदभाव होत असल्याचा आरोप होत आहे. या सगळ्या मुद्द्यांमुळे मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहून आपला विरोध नोंदवला. बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाराज मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला..दुसरीकडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "आठ मंत्री गैरहजर होते, पण त्याची अनेक कारणे आहेत. अनेक मंत्री स्थानिक निवडणुकांच्या प्रचारासाठी मतदारसंघात गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर बैठकीला हजर होते. कोणत्याही मंत्र्यांची नाराजी नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. विनाकारण चुकीचे भास निर्माण केले जात आहे." .राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना महायुतीतील हा अंतर्गत वाद समोर आल्याने विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.