Cashew Plantation agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Plantation : काजू पिकापासून मद्यनिर्मिती शासन लवकरच निर्णय : अजित पवार

Brewing Cashew Crop : काजू पिकापासून मद्यनिर्मिती तसेच काजू बी परतावा याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

sandeep Shirguppe

Kolhapur News : चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काजू पीकाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून १ हजार ३२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमधून काजू पीकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे.

चंदगड मतदार संघातील कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी आमदार राजेश पाटील यांना ग्वाही दिली.

यावेळी पवार म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात काजूचे उत्पादन विपुल प्रमाणात होते. त्यापासून मूल्यवर्धित उत्पादने घेण्याची गरज आहे. काजू पिकापासून मद्यनिर्मिती तसेच काजू बी परतावा याबाबत शासन लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

चंदगड येथे नगरपंचायतीच्या कै. नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत भूमिपूजन व कोनशिला अनावरण, शिवसृष्टीचे लोकार्पण, प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी व कोनशिला अनावरण, चंदगड नगरपंचायतीच्यावतीने नागरी सत्कार समारंभ व जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते.

पाण्याचे नियोजन

चंदगड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येत आहे. तालुक्यात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

शेतकऱ्यांना अनुदान देणार

जिथे जिथे शेतकऱ्यांना डायरेक्ट इन डायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे. मला वारंवार विचारणा होतेय वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत काय झालं आम्ही मागे महाआघाडीचे सरकार असताना वेळेत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान जाहीर केले.

दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना आणि कर्जमाफी केली. परंतु 70 हजार हून अधिक शेतकरी या योजनेपासून अद्यापही वंचित राहिलेले आहेत. यामध्ये सर्वाधित कोल्हापूर जिल्ह्यातील असल्याने मी यामध्ये विशेष लक्ष घालणार असल्याची माहिती पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT