NCP Crisis : राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील बंडांनतर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. तत्पूर्वी शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. पवारांच्या खेळीनंतर मुंबईतील यशंवतराव चव्हाण सेंटरवर अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदार दाखल झाले. शरद पवार यांच्यासोबत सुमारे अर्धा तास चर्चा झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटले म्हणाले, पवारसाहेबांनी आजही आमचं म्हणणं एेकून घेतलं. पक्ष एकसंघ राहवा, ही इच्छा व्यक्त करण्यात आली.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षामध्ये शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहे. अजित पवार गट शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला आहे. तर शरद पवार बंगळुरूतील विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पण रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळांसह मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आजदेखील शरद पवार यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बंडखोर आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसनव्यवस्था विरोधी पक्षांच्या बाकांवरच केली जावी. असे मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यातील राष्ट्रवादीच्या मंत्र्याची ओळख करून दिली. परंतु राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये अजूनही संभ्रम असल्याने अनेक आमदारांनी आज अधिवेशनाला दांडी मारली. शेतकरी प्रश्नांवर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दिवसभराचे कामकाज तहकूब करण्यात आले.
विधिमंडळाच्या कामाकाजानंतर अजित पवार यांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर दुपारी २ वाजता बंडखोर आमदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यात अजित पावर, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल पाटील आणि इतर आमदार शरद पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.