Indian Farmer Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Waiver Controversy: स्वपक्षाच्या जाहीरनाम्याचा अजित पवार यांना विसर

Maharashtra Farmers Issue: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्या महायुती सरकारातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘‘मी आश्वासन दिलं होतं का?’’ असा सवाल करत कर्जमाफीला बगल दिली. मात्र त्यांच्या पक्षानेच २०२४ च्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे ठळक आश्वासन दिले होते, हे शेतकऱ्यांच्या लक्षात आहे!

Dhananjay Sanap

Kolhapur News: विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचा वादा केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘‘मी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते का?’’, असा सवाल विचारत अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २) कर्जमाफीला बगल दिली आहे. कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांना कर्जमाफीवरून माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देणे त्यांनी टाळले.

परंतु कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते? मी दिले होते का? असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना केला. परंतु ६ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रवादी कॉँग्रेसने ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्र’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अजित पवारांना घोषणापत्राचा विसर पडला का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

महायुती सरकारच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर आणि नाशिक जिल्ह्यांतील प्रचारसभेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तर महायुतीच्या जाहीरनाम्यातही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत आहेत. परंतु अजित पवार यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीला नकार दर्शवीत कर्जमाफीचे आश्वासन दिले नव्हते, असा घुमजावही केला आहे. राज्यात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाने कर्जमाफीवरून रान तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

त्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर गुरुवारी जोरदार टीका केली. कर्जमाफी देणे होत नव्हती, तर मग आश्वासन का दिले, असा सवाल शेट्टी यांनी राज्य सरकारला केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासन दिले. त्यामुळे राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळून कर्जमाफी तातडीने करावी.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT