Loan Waiver Delay: रखडलेली कर्जमाफी, कमी विमा परताव्यामुळे शेतकरी नाराज

Farmer Issue: निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेली कर्जमाफीची हमी प्रत्यक्षात न आल्याने आणि पीकविमाही अपुरा मिळाल्याने नांदेडमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
Farm Loan Waiver
Farm Loan WaiverAgrowon
Published on
Updated on

Nanded News : निवडणुकीपूर्वी भाजप प्रणीत महायुतीने कर्जमाफीचे दिलेले आश्‍वासन सरकार स्थापन झाल्यानंतर पूर्ण केले नसल्यामुळे सरकारविरोधात रोष वाढत असताना नांदेडमधील शेतकऱ्यांना अग्रिम पीकविमाही कमी प्रमाणात मिळत आहे. तर दुसरीकडे मजुरांच्या समस्येमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून, त्यामुळे उत्पादन खर्चातही सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.

सत्तारूढ भाजपप्रणीत महायुतीने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करू, असे आश्‍वासन दिले होते. परंतु सत्ता मिळाल्यानंतर मात्र कर्जमाफीचा विचार सोडून वेळेत पीककर्ज भरा, अशी सूचना राज्य सरकारने केल्याने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्‍वासनाचा सरकारला विसर पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा फटकाही बसत आहे.

Farm Loan Waiver
Farmer Loan Waiver : शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे सरकारचा डाव; अजित नवलेंचा कर्जमाफीवरून सरकारवर निशाणा

शेतीकामासाठी मजूर मिळत नसल्याने शेती कामे ठप्प आहेत. परिणामी पीक कापणीसह शेतीकामावर परिणाम दिसून येत आहे. यामुळे ऐनवेळी बाहेरील व्यक्ती आणून कामे करावी लागत आहेत. यातून उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. तसेच नांदेड जिल्ह्यात २०२४ च्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मध्य हंगामातील अनुकूल परिस्थिती लागू करून २५ टक्के विमा भरपाईसाठी अधिसूचना लागू केली.

Farm Loan Waiver
Loan Waiver Demand : बॅंकांकडून कर्जदार शेतकऱ्‍यांची पिळकवणूक

यात कपाशी, सोयाबीन, ज्वारी व तूर या पिकांचा समावेश करून यासाठी शेतकऱ्यांना ४०० ते ४१० कोटी रुपये परतावा मिळेल, असे कळविले होते. परंतु यानंतर विमा कंपनीने यातील ज्वारी व तूर पिकांना वगळून केवळ सोयाबीन व कपाशीसाठी २५८ कोटींचा मंजूर केलेला विमा परतावा सध्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येत आहे. परंतु यातून शेतकऱ्यांना कमी प्रमाणात विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

महायुतीने निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे आश्‍वासन दिल्यामुळे आम्ही अडचणीतील शेतकऱ्यांनी महायुतीला पाठिंबा व्यक्त केला. परंतु आता ते कर्जमाफीसाठी टोलवा-टोलवी करत आहेत.
दिनकर पाटील, शेतकरी, खानापूर, ता. देगलूर, जि. नांदेड
पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे सोयबीन उत्पादनात यंदा फटका बसला. विमा परतावा बरा मिळेल, असे वाटत असातना सोयाबीनसाठी हेक्टरी तीन ते साडेतीन हजार रुपये परतावा मिळत आहे. यातून आम्हा शेतकऱ्यांना काही संरक्षण मिळत नाही.
भास्करराव कदम, शेतकरी, लिंबगाव, ता. जि. नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com