Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Cooperative Institute Maharashtra : सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत

Ajit Pawar News : राज्यातील लोकांनी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासह नव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : राज्यातील लोकांनी शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यासह नव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. राज्यातील सहकारी संस्था चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत अशी सरकारची भूमिका आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच राहुरी कारखान्याला मदत करण्याचे आश्वासन दिले.

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे रविवारी (ता. २७) शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांनी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की सुसंस्कृत महाराष्ट्र घडवला गेला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहे. राज्यातील वेगवेगळ्या संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत अशीच माझी भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील अनेक दिग्गज लोकांनी त्या-त्या काळात प्रयत्नांची शिकस्त करून साखर कारखाने उभे केले.

सहकारी बॅंक ग्रामीण भागाला मदत करणारी, शेतकऱ्यांची आर्थिक नाडी आहे. बॅंक चांगली चालली पाहिजे. राज्यात सगळीकडे जातो. तेथे चौकस प्रश्न विचारतो. पशुधन, कुक्कुटपालन, आदींची चौकशी करतो. आता ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या वापराबाबत माहिती घेतो. आम्ही हे तंत्रज्ञान वापरत आहोत. जिथं जे चांगले ते आपण आत्मसात केले पाहिजे.

राज्य सरकार संस्था चालकांच्या पाठीशी आहे. मात्र लोकांसाठी संस्था चालकांनी काम केले पाहिजे. विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठ्या बाजार समित्यांबाबत काही निर्णय महायुतीचे सरकार घेणार आहे.

त्याबाबतचा प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. राज्यातील काही बाजार समित्यांची अवस्था अत्यंत वाईट असून निवडणुका घेण्यासाठीही पैसे नाहीत. मी कधीही चुकीचे समर्थन करत नाही. एक-दोन वेळा समजून सांगेन, परंतु चुकीला माफी करणार नाही.

आम्ही काही बोलावे की नाही...

अजित पवार यांनी माध्यमावर नाराजी व्यक्त करत आम्ही बोलावे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, की जनतेने सरकारला सर्वाधिक पाठबळ दिले. जनतेचे काम करणे आता आमची जबाबदारी आहे. आता लोकांचे प्रश्न सोडवून दिलासा देता येईल, लोकांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणता येईल यासाठी काम करत आहे.

हे चॅनेलवाले मी माझ्या पद्धतीने बोलत असताना नेमके तेवढे दाखवतात. काही गोष्टी मला खटकल्या तर मी माझ्या लोकांना बोलायला नको का, मी माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही तर राज्यासाठी बोलतोय. माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद नाइलाजाने घ्यावे लागले. यंदाही माळेगाव कारखाना राज्यातील पहिल्या पाच कारखान्यात दर देण्यात पुढे असेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Cultivation : सततच्या पावसाने ऊस पीक धोक्यात

Crop Damage Survey : सांगली जिल्ह्यातील दीड हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले

Bajari Sowing : खानदेशात बाजरी पीक जोमात

Crop Insurance : शेतकऱ्यांना मिळणार १२७ कोटींची भरपाई

SCROLL FOR NEXT