Ajit Pawar: कृषिमंत्र्यांबाबत चर्चेअंती निर्णय

Manikrao Kokate Rummy Controversy: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावरील कारवाईबाबत थेट भाष्य टाळले.
Manikrao Kokate and Ajit Pawar
Manikrao Kokate and Ajit PawarAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी सोमवारी चर्चा करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांच्यावरील कारवाईबाबत थेट भाष्य टाळले.

गुरुवारी (ता. २४) मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. कोकाटे यांना इजा, बिजा झाले आहे आता तिजा करू नका, असे आधीच सांगितले होते. तरीही ते असे का वागतात याबाबत विचारणा करणार आहे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. पवार गुरुवारी जेएनयूतील कुसुमाग्रस्त अध्यासनाच्या उद्‍घाटनासाठी जाणार होते. मात्र बैठकांमुळे नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी मंत्रालयात थांबणे पसंत केले. दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोकाटे यांच्याबाबत चर्चेअंती निर्णय घेणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘‘माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो सभागृहाच्या आत घडलेला प्रकार आहे.

Manikrao Kokate and Ajit Pawar
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्र्यांच्या भवितव्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय?

विधिमंडळाचा परिसर सभापती आणि अध्यक्षांच्या अख्यत्यारित येत असतो. त्यांनी या बाबतची चौकशी सुरू केली आहे, असे ऐकिवात आहे. नक्की तेथे काय घडले हे चौकशीअंती समोर येईल. कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन रमी खेळत नसल्याचा खुलासा केला आहे. माझी त्यांची भेट झालेली नाही. सोमवारी ही भेट होऊ शकते.’’

‘‘महायुती सरकार आल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांना सूचना दिल्या होत्या. भान ठेवून वागले, बोलले आणि निर्णय घेतले पाहिजेत. मागे दोन वेळा त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या, तेव्हाही मी त्याची दखल घेऊन असे होता कामा नये, अशा सूचना दिल्या होत्या. इजा झाले, बिजा झाले आता तिजाची वेळ आणू नका, असे मागेच सांगितले होते. ते म्हणतात मी रमी खेळलो नाही. नक्की काय आहे ते निष्पन्न होईलच. मी सोमवारी त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय आमच्या अखत्यारितला असेल. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून तो निर्णय घेतला जाईल.

तारतम्य ठेवणार की नाही?

महायुतीतील वाचाळ मंत्र्यांना फटकारत श्री. पवार म्हणाले, ‘‘मंत्र्यांनी लोकांसमोर, माध्यमांसमोर तारतम्य ठेवूनच वागले, बोलले पाहिजे. स्वत:ला काही बंधने घालून घेणार आहोत की नाही?’’

Manikrao Kokate and Ajit Pawar
Manikrao Kokate Controversy: कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यावर सोमवारी निर्णय घेऊ; अजित पवार

अर्थमंत्री म्हणून अडचणी दूर करेन

कृषिमंत्री कोकाटे यांनी पावसाळी अधिवेशनात एका प्रश्नाच्या उत्तरादरम्यान कृषी विभागाला १२०० कोटी रुपयांचा निधी मिळत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे नवीन कामे होत नसल्याचेही ते म्हणाले. याबाबत श्री. पवार यांना प्रश्न विचारला असता, ‘मी अर्थमंत्री म्हणून अडचणी दूर करेन,’ इतकेच सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

खातेबदलाबाबत चर्चा?

मंत्री कोकाटे यांच्याकडील कृषी खाते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडे देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे चर्चा झाल्याचे समजते. गुरुवारच्या पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्‍न विचारला असता, पवार यांनी त्याला उत्तर देणे टाळले. सोमवारी किंवा मंगळवारी पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. मात्र खातेबदलाबाबत ठाम निर्णय झाल्याचेही समजते.

रोहित पवारांना फटकारले

आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर आपण रमी खेळत नव्हतो तर जाहिरात पुढे ढकलत होतो, असा दावा कृषिमंत्री कोकाटे यांनी केला होता. त्यावर रोहित पवार यांनी, कोकाटे खोटे बोलत असल्याचे सांगत आणखी व्हिडिओ पोस्ट केले. याबाबत श्री. पवार यांना विचारले असता, ‘‘कोण काय बोलतो याला मी महत्त्व देत नाही. महायुतीमध्ये आमच्या कुठल्याही घटकाकडून महायुतीला कमीपणा येईल असे वक्तव्य करू नये याला आम्ही प्राधान्य देतो. ज्यांच्याकडे व्हिडिओ, पेनड्राइव्ह आहेत ते एकदाच बाहेर काढा. आम्हाला दम देऊ नका,’’ असे त्यांनी रोहित पवार यांना फटकारले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com