Ajinkyatara Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Ajinkyatara Sugar Mill: अजिंक्यतारा कारखान्याला ‘भारतीय शुगर्स’चा पुरस्कार

Indian Sugars Award: सातारा जिल्ह्यातील शेंद्रे गावचा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना देशपातळीवर नावारूपाला आला असून, भारतीय शुगर्स संस्थेने २०२५ चा ‘बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल’ पुरस्कार जाहीर केला आहे.

Team Agrowon

Satara News: सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील साखर उ‌द्योगाशी संलग्न भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा सर्वोत्कृष्ट साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, चषक व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोल्हापूर येथे १८ जुलैला या पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी दिली आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज प्रगतिपथावर आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र श्री. शिंदे यांनी कारखान्यावर समक्ष येऊन कारखान्याचे अध्यक्ष यशवंत साळुंखे, उपाध्यक्ष नामदेव सावंत यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी भारतीय शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, तसेच खाते प्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

विक्रमसिंह शिंदे म्हणाले, ‘‘१९७५ पासून ही संस्था कार्यान्वित असून, साखर कारखान्यांना मार्गदर्शन करत आहे. सध्या संस्था त्रयस्थाच्या भूमिकेतून सहकारी, तसेच खासगी साखर कारखाने व तेथील अधिकारी जे चांगले काम करीत आहेत, त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना प्रोत्साहित करीत आहे.’’

जिवाजी मोहिते म्हणाले, ‘‘कारखान्याने सुरुवातीपासून शेतकऱ्यांचे हित जोपासलेले आहे. कारखान्याची दैनंदिन क्षमता ४५०० टन, आसवनी क्षमता ४५ हजार लिटर्स केली आहे. शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट वेळेत देण्याची परंपरा राखली आहे. या बाबींचा विचार करून भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केलेला आहे. कारखान्याच्या कार्याची दखल घेऊन राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २९ पुरस्कार मिळालेले आहेत. या जाहीर झालेल्या ३० व्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडली आहे.’’

या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संचालक व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांनी सर्व सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कामगार-कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karul Ghat Landslide: मुसळधारेमुळे करूळ घाटात दरड कोसळली

Farm Roads: शेतरस्ते, पाणंद रस्त्यांना मिळणार क्रमांक

Agro Processing Industry: कृषी प्रक्रिया उद्योग वाढविण्याची गरज: संचालक सतीश मराठे

Pune APMC: पुणे बाजार समिती गैरव्यवहार चौकशी समितीमधून वगळा

Delhi Flood: यमुनेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ

SCROLL FOR NEXT