Pune News: राज्याच्या खरीप हंगाम २०२५-२६ मधील एकूण पेरा १५६ लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.२०१७ ते २०२१ अशा सलग पाच खरीप हंगामात राज्याचा सरासरी पेरा १४२ लाख हेक्टर राहिला आहे. २०२३ मध्ये पेरा १४१ लाख हेक्टर, तर २०२४ एकूण पेरा १४६ लाख हेक्टर झाला. गेल्या हंगामात सोयाबीनचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा (४२ लाख हेक्टर) वाढून ५२ लाख हेक्टर झाला होता. त्या तुलनेत कपाशीचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा (४२ लाख हेक्टर) घटून ४१ लाख हेक्टरवर आला. गेल्या हंगामात मक्याचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा (९ लाख हेक्टर) १२७ टक्के वाढून थेट ११ लाख हेक्टरपर्यंत आला होता.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, खरीप-२०२५ साठी पेरणीचा लक्षांक १५६ लाख हेक्टरच्या पुढे ठेवण्यात आला आहे. लक्ष्यांक ठरवताना मागील पाच वर्षांत आलेल्या कमाल उत्पादकतेच्या तुलनेत दहा टक्के अधिक उत्पादकता असावी, असेही नियोजन करण्यात आले आहे. वाढीव पेरा विचारात घेत यंदा १३१ टक्के बियाणे उपलब्ध आहे. प्रमुख पिकांसाठी यंदा १९.१४ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असेल. मात्र, राज्यात आताच २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. मॉन्सूनचे आगमन यंदा वेळेत असल्याचे गृहीत धरण्यात आले आहे. परंतु पावसाचा खंड भविष्यात आलाच तर दुबार पेरणीची समस्या उद्भवू शकते. त्यासाठी अधिकचे बियाणे उपलब्ध आहेत.
खरीप-२०२५ मधील बियाण्यांची गरज व उपलब्धता
पीक-पेरणी क्षेत्र लक्ष्यांक (लाख हेक्टरमध्ये- बियाण्याची आवश्यकता (क्विंटलमध्ये)--बियाणे उपलब्धता (क्विंटलमध्ये)
भात - १५.२५-२१९६००-२९२९८६
ज्वारी - १.०८-८१००-११४३२
बाजरी- ४-००-१००००-१६६४२
मका-११.२०-१६८०००-२०८७२९
तूर-१२.२५-५३५९४-७९१३५
मूग-२.५०-९०००-१०१३४
उडीद-३.७०-२२२००-३२४४७
भुईमूग-१.४८-५९२०-६४४५
तीळ -०.०४-५५-३२५
सोयाबीन- ५०.५-१३२५६२५-१७१५६३४
बीटी कापूस- ४१.००-८२०००-१२२६७७
इतर पिके - १.९७-१००००-११९३३
काटेकोर नियोजन गरजेचे
खरिपाचा वाढीव पेरा लक्षात घेता त्यासाठी खताचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी काटेकोर नियोजन कृषी विभागाला करावे लागणार आहे. मात्र राज्यात आतापासूनच डीएपीची टंचाई असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. खरिपासाठी एकूण ४६.८२ लाख टन खतांचा पुरवठा होणार आहे. तसेच सध्या राज्यात २५.५७ लाख टन खते शिल्लक आहे, असा दावा कृषी विभागाचा आहे. दरम्यान, खरीप हंगामासाठी शासनाच्या सर्व विभागांकडून झालेल्या तयारीचा आढावा येत्या बुधवारी (ता.२१) मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे. त्यामुळे कृषी व संलग्न विभागांमध्ये गेल्या आठवडाभरापासून धावपळ सुरू आहे.
खरीप २०२५ मधील खत पुरवठ्याचे नियोजन
खताचा प्रकार : खरीप २०२४ मधील वापर ः खरीप २०२५ मधील मंजूर पुरवठा ः सध्याचा शिल्लक साठा (सर्व आकडे लाख टनांत)
युरिया -१५.५४-१५.५२-७.३०
डीएपी-३.९६-४.६०-०.९४
एमओपी - १.१३-१.२०-१.१५
संयुक्त खते-१८.३४-१८.००-१०.९७
एसएसपी-५.३३-७.५०-५.२१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.