Agriculture Ai Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Ai : ‘एआय’ तंत्रज्ञानाने ऊस शेतीमध्ये क्रांतिकारक बदल

Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासोबतच टनेज देखील वाढू शकते ही बाब बारामतीत प्रत्यक्षात आली आहे.

Team Agrowon

Baramati News : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून उसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासोबतच टनेज देखील वाढू शकते ही बाब बारामतीत प्रत्यक्षात आली आहे. शरदचंद्र पवार आधुनिक ऊस शेती विस्तार प्रकल्प या अंतर्गत बारामतीत भारतातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीने राबविण्यात येत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार,

‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, डॉ. रजनी इंदुलकर, ऑक्स्फर्डचे संचालक डॉ. अजित जावकर, विश्‍वस्त विष्णुपंत हिंगणे, राजीव देशपांडे, डॉ. अविनाश बारवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. ३०) कृषी विज्ञान केंद्रामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

आजमितीस प्रति एकर उसाचे सरासरी उत्पादन ३५ ते ४० टनांपर्यंत घसरले आहे. पर्यायाने ऊस शेतीमध्ये आर्थिक नफा कमी होत चालला आहे. ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट आणि अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने गेल्या तीन वर्षांपासून ऊस शेतीवर संशोधन केले आहे. येथील कृषी विज्ञान केंद्रात त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

राज्यभरातील एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात ऊस शेतीमध्ये हवामान बदल, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), उपग्रह आधारित भौगोलिक प्रणाली (जीआयएस), मशिन लर्निंग अशा तंत्रज्ञानाचा वापर करून पहिल्या टप्प्यात २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. उर्वरित ८०० शेतकऱ्यांच्या शेतात पूर्व व सुरू हंगामामध्ये हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.

...असे झाले फायदे

उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत वाढ.

उत्पादन खर्चात २० ते ४० टक्क्यांची घट.

तीस टक्के पाण्याची बचत.

रासायनिक खतांच्या वापरात २५ टक्के घट.

कापणी कार्यक्षमतेत ३५ टक्क्यांपर्यंत सुधारणा.

कीड, रोगांच्या योग्य वेळी निरीक्षणामुळे कीडनाशकांच्या वापरात २५ टक्के बचत.

‘एआय’ तंत्रज्ञानाचे फायदे

ऊस उत्पादन वाढ.

जमिनीची सुपीकता वाढीसाठी फायदा.

सिंचन कार्यक्षमता वाढेल, पाण्याचा अतिरिक्त वापर कमी होतो.

कीड, रोगांचे अचूक विश्‍लेषण शक्य.

सेंद्रिय कर्ब मूल्यमापनाद्वारे भविष्यात शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिटचा फायदा मिळेल.

उत्पादन वाढीने शेतकऱ्यांना उत्पन्न वाढ मिळेल. ऊस शेतीमध्ये क्रांतिकारक बदल अपेक्षित आहेत.

एक एकर क्षेत्र असलेला शेतकरीही अवघ्या पाच हजारांत या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकतो. उसाची रिकव्हरी आणि उत्पादन वाढेल. हा प्रयोग राज्यात राबविल्यास किमान बारा हजार कोटी रुपययांचे अतिरिक्त उत्पन्न मिळेल. याबाबत ग्लोबल पेटंट घेण्याची सूचना आली असून त्यावर विचार सुरू आहे.
प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह
एआय तंत्रज्ञानाचा ऊस उत्पादकांकडून प्रभावीपणे वापर झाल्यास राज्यात १५ हजार, तर देशस्तरावर ३५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल, त्या अर्थाने कृषी अर्थकारणाला कलाटणी देणारा हा प्रकल्प ठरेल.
शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री
एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होईल तेव्हा कृषी क्षेत्रात आर्थिक क्रांती होईल. सर्व शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानामुळे लाभ होणार आहे. पुढील वर्षी याचे परिणाम दिसून येतील.
डॉ. अजित जावकर, संचालक, ऑक्स्फर्ड विद्यापीठ, लंडन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : '...तर अपक्ष किंवा लहान पक्षातील एखादा मुख्यमंत्री ही होऊ शकतो' : बच्चू कडू यांचा दावा

Sangli Assembly Election : सांगलीत चुरशीने मतदान

Ahilyanagar Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यात नागरिकांचे उत्साहात मतदान

Rahul Gandhi On Gautam Adani : अमेरिकेत अदानींवर खटला दाखल, अदानींना तात्काळ अटक करण्याची राहुल गांधी यांची मागणी

Ratnagiri Assembly Election : सकाळी शेतात राबलो, दुपारी मतदान

SCROLL FOR NEXT