Agriculture AI : शेती क्षेत्रात ‘एआय’चा वापर लाभदायी

AI Technology : आपल्या देशाची दिवसागणिक वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात शेती क्षेत्रालाच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे.
AI For Soil Fertility
AI For Soil Fertility Agrowon
Published on
Updated on

Akola News : आपल्या देशाची दिवसागणिक वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात शेती क्षेत्रालाच अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. पर्यायाने कृषी विद्यापीठांची व्याप्ती अधिक वाढणार असल्याने काळाची गरज लक्षात घेता शेतीक्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) प्रभावी वापर अधिक लाभदायक ठरेल, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (नवी दिल्ली) उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ५६ वा स्थापना दिवस रविवारी (ता. २०) विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात झाला. त्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख हे अध्यक्षस्थानी होते.

कृषी शिक्षण, संशोधनासह कृषी विस्तार कार्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक अग्रेसर होत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी इतर विद्यापीठांनी अवलंबिलेले तंत्रज्ञान व प्रयोग आपल्याकडे देखील रुजवणे गरजेचे असल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले.

AI For Soil Fertility
Agriculture AI : कृत्रिम बुद्धिमत्तेचा ऊस लागवडीसाठी वापर

‘‘येणाऱ्या काळात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला देशभरातील अग्रगण्य दहा कृषी विद्यापीठांमध्ये स्थान मिळवण्यासाठी विद्यापीठातील सर्वच घटक तन-मन-धनाने कृतिशील आहेत,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. गडाख यांनी केले.

तसेच या कृषी विद्यापीठाच्या गत पाच दशकांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करीत विद्यापीठाचे माजी कुलगुरू, कार्यकारी परिषद सदस्य, शास्त्रज्ञ, अधिकारी, कामगार यांच्या प्रति ऋण देखील याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले. तर संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आभार मानले.

AI For Soil Fertility
Agriculture AI Technology : गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी ‘एआय’ तंत्रज्ञान

कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण

विद्यापीठाअंतर्गत सर्वोत्तम कार्य करणाऱ्यांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये अकोला कृषी महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालयाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कृषी तंत्र विद्यालय, मूल मारोडा (जि. चंद्रपूर ) यांना उत्कृष्ट कृषी तंत्र विद्यालयाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विभागीय कृषी संशोधन केंद्र (सिंदेवाही, जिल्हा चंद्रपूर) यांना उत्कृष्ट कृषी संशोधन प्रकल्प पुरस्कार तर कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा (जि. वर्धा) यांना उत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वैयक्तिक पुरस्कारांमध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. राजेश्वर शेळके यांना उत्कृष्ट शिक्षक, कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. संजय काकडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधक, कृषी विज्ञान केंद्रा (सेलसुरा, जिल्हा वर्धा)चे प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांना उत्कृष्ट विस्तार संशोधक पुरस्कार आणि विभागीय फळ संशोधन केंद्रा (काटोल)चे डॉ. हितेंद्रसिंग गोरमनगर कृषी यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापक तर मध्यवर्ती संशोधन केंद्र अकोलाअंतर्गत वाशीम रोड फार्मचे शंकर देशमुख यांना उत्कृष्ट प्रक्षेत्र व्यवस्थापनाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com