AI In Farming Agrowon
ॲग्रो विशेष

AI In Farming: ‘वारणा’ ५०० एकरांवर वापरणार ‘एआय’ तंत्रज्ञान

Smart Agriculture: येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील पाच गटांत ५०० एकर उसाच्या क्षेत्रावर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीचा प्रयोग साकारणार आहे. त्यासाठीचा खर्च वारणा काररखाना करणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी केली.

Team Agrowon

Kolhapur News: येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील पाच गटांत ५०० एकर उसाच्या क्षेत्रावर एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीचा प्रयोग साकारणार आहे. त्यासाठीचा खर्च वारणा काररखाना करणार असल्याची घोषणा आमदार विनय कोरे यांनी केली.

वारणा साखर कारखाना, इलाईट कृषी सेवा संस्था व वसंतदादा शूगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व आधुनिक ऊस शेती व शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान वापर, या विषयावर डॉ. कोरे बोलत होते. व्हीएसआयचे पीक उत्पादक व संरक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग, बारामती कृषी विज्ञान केंद्राचे तुषार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कोरे म्हणाले, ‘‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांनी उसाच्या नव्या क्रांतीकडे वळावे. वारणा कारखान्याचे सहकार्य राहील.’’ डॉ. ए. डी. कडलग म्हणाले, ‘‘शेतात कीड व रोगांचा वाढलेला प्रादुर्भाव, खते व कीटकनाशकांचा अनावश्यक वापर, हवामानबदल, हेक्टरी उत्पादन कमी अशा कारणांनी शेती क्षेत्रावर परिणाम झाला आहे.

उत्पादकता वाढीसाठी माती परीक्षण महत्त्वाचे आहे. ऊस उत्पादकता, साखर उतारा, तोडणी नियोजन याबाबत अचूक माहिती देणारे तंत्रज्ञान समजून घ्यावे. शाश्वत ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचे महत्त्व समजून घ्यावे.’’

तुषार जाधव म्हणाले, ‘‘उपग्रह प्रणाली, स्वयंचलित हवामान केंद्र, फवारणी, निरीक्षण ड्रोन, उसाचे नियोजन यासह अन्य तंत्रज्ञान विकसित केले तर जमिनीची सुपीकता अबाधित राहील. शेतकऱ्यांसह साखर कारखान्यांनीही नवे तंत्रज्ञान विकसित करावे.’’ इलाईट कृषी सेवा संस्थेच्या नवीन ड्रोनचे उद्‍घाटन आमदार कोरे यांच्या हस्ते झाले. ते सवलतीत सभासद, शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ऊसविकास अधिकारी सुभाष करडे यांनी स्वागत केले.

या वेळी उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, कार्यकारी संचालक एस. आर. भगत, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, इलाईट कृषी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, संचालक सुभाष पाटील, श्रीनिवास डोईजड, संचालक, मुख्य शेती अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह वारणा उद्योग समूहातील पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. एन. आर. चोपडे यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल पाटील यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Cooperative Fraud: परभणीच्या तब्बल ४२ संस्थांची नोंदणी रद्द

ICAR Farmer Awards: ‘आयसीएआर’च्या कृषी पुरस्कारात गृहमंत्रालयाचा खोडा

Farmer Protest: कृषी वायदे बाजार मुक्तीसाठी शेतकरी संघटना करणार आंदोलन

Admission Criteria: कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी गुणांची अट शिथिल

Lumpy Disease: मोकाट जनावरांमुळे फैलावतोय ‘लम्पी’ आजार  

SCROLL FOR NEXT