Nagar Urban Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Urban Bank : बँक बुडवणार्‍यांवर जबाबदारी निश्चिती करा; केंद्रीय सहकार मंत्रालयाचे आदेश

Union Ministry of Co-operation : नगरमधील नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. त्यावरून केंद्रीय सहकार मंत्रालयाने संचालकांना जबर धक्का दिला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : अहमदनगरमधील नगर अर्बन बँकेत २९१ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. त्यावरून जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तर यावरून योग्य कारवाई करण्यात यावी. तसेच बँकेत गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांवर जबाबदारी निश्चिती करा अशी मागणी नगरमधील ज्येष्ठ वकिलांनी केली होती. त्याप्रमाणे केंद्रीय सहकार मंत्रालयाने संचालकांना झटका दिला आहे. बँकेतील गैरव्यवहाराप्रकरणी संचालकांसह वरिष्ठ व कनिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश अवसायक अधिकाऱ्यास केंद्रीय सहकार मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे आधीच फॉरेन्सिक ऑडिटच्या पोलिस कारवाईत अडकलेले संचालक वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी आता केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या कारवाईच्या दणक्यात सापडले आहेत.

नगर अर्बन बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अच्युत पिंगळे यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे ३१ मे रोजी तक्रार केली होती. तसेच अर्बन बँकेतील गैरव्यवहार करणारऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे केंद्रीय सहकार निबंधक सूर्यप्रकाश सिंग यांनी अवसायक गणेश गायकवाड यांना पत्रातून कारवाईचे आदेश दिले.

तसेच बँकेचे संचालक तसेच वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांवर गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. तर मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटी कायदा २००२ मधील तरतुदीनुसार संचालक, वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई करावी. तर बँकेच्या गैरव्यवहारात असणाऱ्यांकडून वसुली करून त्याचा अहवाल तातडीने पाठवण्याचे आदेश देखील सिंग यांनी दिले आहेत.

दरम्यान बँकेची आर्थिक फसवणूक प्रकरणी बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेऊन तपास केला. यावेळी करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडीट तपासात हा घोटाळा २९१ कोटींचा असल्याचे उघड झाले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी माजी संचालक, अधिकारी व कर्जदारांसह १०५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत १३ ते १४ जणांची अटक झाली आहे. मात्र अजूनही अनेकजण फरार आहेत.

'या' संचालक आणि अधिकाऱ्यांचा समावेश

यामध्ये माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक अनिल कोठारी व मनेष साठे यांच्यासह राजेंद्र डोळे, प्रदीप पाटील, राजेंद्र लुणिया, मनोज फिरोदिया या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : शेती पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; मदत व पुनर्वसन मंत्री जाधव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Crop Loss Compensation : भरपाईप्रश्‍नी जिल्हाधिकारी करणार हस्तक्षेप

Heavy Rain Vidarbha : अमरावती-यवतमाळ जिल्ह्यांत ढगफुटीसदृश पाऊस

Crop Insurance : तीन लाख हेक्टरवरील पिकांना नाही विमा कवच

Heavy Rainfall Nanded : नांदेडमधील सिंदगी मंडलांत ढगफूटी

SCROLL FOR NEXT