Market Committee Agrowon
ॲग्रो विशेष

Nampur Market Committee : नामपूर बाजार समिती सभापतिपदी अहिरे बिनविरोध

APMC Update : नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (ता. १) सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली.

Team Agrowon

Nashik News : सटाणा बाजार समितीच्या विभाजनानंतर नव्याने स्थापन झालेल्या येथील नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी खालचे टेंभे (ता. बागलाण) येथील माजी सरपंच, बळीराजा आत्मसन्मान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांची बिनविरोध निवड झाली.

नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे यांनी आवर्तनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (ता. १) सकाळी अकरा वाजता संस्थेच्या कार्यालयात घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सटाणा येथील सहायक निबंधक जितेंद्र शेळके अध्यक्षस्थानी होते.

सभापतिपदासाठी हेमंत कोर सूचक होते. उपसभापती भाऊसाहेब कांदळकर यांनी अनुमोदन दिले. निर्धारित वेळेत सभापतिपदासाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक अधिकारी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवडीनंतर संचालक मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सभापती भाऊसाहेब अहिरे यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर समर्थकांनी बाजार समितीच्या आवारात गुलालाची उधळण करीत फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेऊन बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन, अशी प्रतिक्रिया सभापती भाऊसाहेब अहिरे यांनी या वेळी दिली.

या वेळी उपसभापती भाऊसाहेब कांदळकर, संचालक हेमंत कोर, संजय भामरे, भाऊसाहेब भामरे, शांताराम निकम, अविनाश सावंत, दीपक पगार, डी. डी. खैरनार, आनंदा मोरे, लक्ष्मण पवार, चारुशिला बोरसे, चंद्रभागाबाई शिंदे, मधुकर चौधरी, अविनाश निकम, सचिन मुथा, दत्तू बोरसे आदी उपस्थित होते. सचिव संतोष गायकवाड यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet Decision: महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर; पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Load Shedding : सततच्या वीजभारनियमनामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

Water Releases Plan: दूधगंगा, वारणेकाठी शेतीसाठी आवर्तने

Agriculture Irrigation Crisis: वीजपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; सिंचनाची कोंडी

MSRTC Electric Buses: एसटी महामंडळाचा निर्णय; जुन्या डिझेल बसेसचे टप्प्याटप्प्याने ई-बसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT