Agrowon Diwali Ank Agrowon
ॲग्रो विशेष

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Diwali Magazine : पशुधनाविषयी निष्ठा जपत दुधाचा व्यवसाय करून आयुष्यात समृद्धी मिळविणाऱ्या प्रगतिशील दूध उत्पादक कुटुंबाच्या हस्ते दैनिक ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन गुरुवारी (ता.१७) करण्यात आले.

Team Agrowon

Kolhapur News : पशुधनाविषयी निष्ठा जपत दुधाचा व्यवसाय करून आयुष्यात समृद्धी मिळविणाऱ्या प्रगतिशील दूध उत्पादक कुटुंबाच्या हस्ते दैनिक ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे दिमाखदार प्रकाशन गुरुवारी (ता.१७) करण्यात आले. यंदाचा दिवाळी अंक ‘पशुधन’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे.

दूध उत्पादनात प्रसिद्ध असणाऱ्या सावर्डे- पाटणकर (ता. राधानगरी) या छोट्या गावातील जिद्दीने दूध व्यवसाय करून प्रगती केलेल्या सुरेश मोरे या दूध उत्पादकाच्या निवासस्थानी ग्रामस्थांच्या साथीने सहकुटुंब प्रकाशन सोहळा रंगला. गोठ्यात राबणाऱ्या हातांनी अंकाचे थाटात स्वागत केले. ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, निवासी संपादक रमेश जाधव, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे, गोकुळचे सहायक संकलन अधिकारी राजू चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक श्री. चव्हाण म्हणाले, की शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम ॲग्रोवन करीत आहे. याचाच एक भाग म्हणून ॲग्रोवनने यंदा ‘पशुधन’ या विषयावरील दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील समृद्धता राज्याच्या इतर भागांत जावी असा आमचा प्रयत्न आहे. गोकुळसारख्या संघांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या आयुष्यात क्रांती आणली आहे. अशाच प्रमुख दूध संघाच्या केसस्टडी मांडण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन दूधधंद्याचे वैभव या अंकात चितारले आहे. याच बरोबर या व्यवसायातून समृद्धी मिळविलेल्या अनेक प्रेरक यशकथाही या अंकात आहेत.

‘गोकुळ’चे सहायक संकलन अधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, की ॲग्रोवनने दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम येथे घेऊन शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशा उपक्रमातून अनेक प्रगतिशील दूध उत्पादक तयार व्हावेत.

श्री. घोरपडे यांनी आभार मानले. या वेळी कांचन मोरे, अनिल मोरे, सुरेखा मोरे, आदित्य मोरे आदींसह दूध उत्पादक उपस्थित होते.

‘ॲग्रोवन’प्रति कृतज्ञता

ॲग्रोवनच्या वतीने शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे दूध उत्पादकांनी कौतुक केले. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्याची परंपरा यंदाही जपली. याबाबत दूध उत्पादकाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

अंक शनिवारपासून सर्वत्र उपलब्ध

‘ॲग्रोवन’चा पशुधन हा दिवाळी अंक शनिवारपासून राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भेटीला येणार आहे. राज्यातील सर्व विक्रेत्यांकडे तो उपलब्ध असेल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT