Natural Farming Awareness Programme Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Farming Program : दोनद येथे कृषी हवामान, नैसर्गिक शेती जागरूकता कार्यक्रम

Natural Farming Awareness Programme : भारत मौसम विज्ञान विभाग यांच्या विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यातील दोनद बुद्रुक (ता. कारंजा) येथे कृषी हवामान व नैसर्गिक शेती जागृकता कार्यक्रम घेण्यात आला.

Team Agrowon

Washim News : भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र व कृषी प्रोद्योगिकी अनुप्रयोग संशोधन संस्था (पुणे), भारत मौसम विज्ञान विभाग यांच्या विद्यमाने कृषी विज्ञान केंद्रातर्फे जिल्ह्यातील दोनद बुद्रुक (ता. कारंजा) येथे कृषी हवामान व नैसर्गिक शेती जागृकता कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी डॉ. राजू काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे होते. मार्गदर्शक म्हणून कृषी विद्या विषयतज्ञ व नोडल अधिकारी टी. एस. देशमुख, फळबागतज्ज्ञ निवृत्ती पाटील व गृहविज्ञानशास्त्र तज्ज्ञ शुभांगी वाटाणे उपस्थित होत्या.

शुभांगी वाटाणे यांनी शेतीतून ग्रामीण आरोग्य आणि पोषण आहार केंद्रित शेतीचे महत्त्व सांगितले. तुषार देशमुख यांनी हवामान व आधुनिक नैसर्गीक शेती तंत्रज्ञान आधारित शिफारशीत पीक व्यवस्थापनातून जुजबी कमी खर्चिक शेतीबद्दल माहिती दिली.

मेघदूत व दामिनी मोबाइल ॲपचा वापर करावा असे सुचविले. निवृत्ती पाटील यांनी बदलत्या वातावरणातून संत्रापीक समूह नियोजनावरील मार्गदर्शन करून गटशेतीचे फायदे सांगितले. तसेच संत्राबागेत पाणी देण्याची पद्धत, खताचे व्यवस्थापन, छाटणी तंत्रज्ञान व बाजारपेठेचे व्यवस्थापनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

डॉ. रवींद्र काळे यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती बदलातून शेतीवरील खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे तसेच जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून माती आरोग्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. काळे यांनी शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीतंत्र व वातावरण बदल माहिती तंत्रज्ञान अवगत करून ग्रामीण पातळीवरून अन्नसुरक्षेचे कार्य करावे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी हवामान निरीक्षक एस. एम. बोदडे यांनी केले. आभार अक्षय गिरी यांनी मानले. पंकज करडे, आदित्य देशमुख व शिवाजी वाघ यांनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation: रब्बीसाठी प्रकल्पांतून मिळणार पाणी

Agriculture Relief Funds: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मिळाली १९१ कोटींची मदत

Farmer Subsidy Challenges: गेवराईतील शेतकऱ्यांना अनुदान मिळणार तरी कसे?

Bihar Election 2025: संकेत आणि संदेश

Interview with Dr Subhas Puri: कृषी विद्यापीठांमध्ये आमूलाग्र बदलांची आवश्यकता

SCROLL FOR NEXT