Aginkya Kottavar
Aginkya Kottavar Agrowon
ॲग्रो विशेष

Aginkya Kottawar : वयाच्या ३१ व्या वर्षी नावावर तब्बल ३५ पेटंट

Team Agrowon

विनोद इंगोले
ग्रामीण भागातील युवक कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात हे आपल्या कार्यकर्तृत्वाने अजिंक्‍य कोत्तावार (Aginkya Kottawar) या युवकाने सिद्ध केले आहे. यवतमाळच्या पाटणबोरी गावातील अजिंक्‍यने खरोखरच अजिंक्‍य असल्याचे सिद्ध करीत वयाच्या ३१ व्या वर्षी तब्बल ३५ पेटंट आपल्या नावे केले आहे.

चहापासून तयार केले बायोडिझेल
अजिंक्यचे गाव यवतमाळ आणि तेलंगणा सीमेवरच्या पाटणबोरी इथले. अजिंक्‍यचे नववीपर्यंत शिक्षण गावात झाले. परंतु अभ्यासात हुशार नसल्याने त्याला पहिल्या वर्गात असतानाच भविष्य सांगणाऱ्याकडे नेण्यात आले होते. हाच अजिंक्य पुढे पीएचडीसाठी आसामला गेला. तेथे त्याने चहाच्या पानापासून बायोडिझेलनिर्मितीमधील संशोधनाचे कार्य आठ महिन्यांतच पूर्ण केले. बायोडिझल तयार करून त्यावर गाडी पण चालविली.

नेपियर गवतापासून तयार केला सीएनजी
नेपियर गवतापासून सीएनजी उत्पादन करण्यात अजिंक्‍य यशस्वी ठरला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, ३० एकर शेतीतून एक टन सीएनजी उत्पादन होते. एका विशिष्ट जातीच्या नेपियर गवतात सीएनजी गॅसचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले. यात ९८ टक्‍के प्युअर मिथेन म्हणजे सीएनजी राहतो.

हळदीची वाढविली उत्पादकता
हळदीला वारंवार जमिनीत पुरल्यानंतर तिला फुटवे सातत्याने वाढतात ही बाब अभ्यासली गेली. जमिनीत पाण्याचे व इतर घटकांचे प्रमाण एका निश्चित मर्यादेत असल्यास हळदीचा कंद अधिक काळ जमिनीत राहिला तरी तो सडत नाही, असे निष्कर्ष समोर आले. त्याआधारे सुरुवातीला १५ आणि त्यानंतर २० महिने पीक जमिनीत ठेवण्यात आले. त्यातून एका मातृकंदाला १५ पेक्षा अधिक फुटवे आल्याचे निष्कर्ष समोर आले. त्याआधारे उत्पादनात वाढ होत ७ ते ८ किलो पर्यंतचा गड्डा याद्वारे मिळविण्यात यश आले आहे. अजिंक्‍यच्या या तंत्रज्ञानाला जर्मन तसेच ऑस्ट्रेलियन पेटंट मिळाले आहे.

हळद क्षेत्रातील संशोधनाला ११ पेटंट
हळदीमध्ये अजिंक्‍यने तब्बल ११ पेटंट मिळविले आहेत. त्यामध्ये २० महिन्यांचे हळदीचे पीक, कुरकुमीन काढताना ५० टक्‍के वेस्ट (वाया) जाते. हे प्रमाण कमी व्हावे याकरिता कुरकुमीन काढण्यासाठी नवी प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. त्याआधारे ९० टक्‍के कुरकुमीन काढण्यात यश आल्याचा दावा अजिंक्‍यने केला आहे. ओल्या हळदीपासून कुरकुमीन काढण्याचे तंत्रज्ञान ही विकसित केले आहे. पावडर फॉर्ममधील हे कुरकुमीन शरीरात ९८ टक्‍के विरघळेल असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. याला पेटंट मिळाले आहे. खास हळदीपासून टूथपेस्ट तयार करण्यात अजिंक्‍य यशस्वी ठरला.

या संशोधनालादेखील पेटंट मिळाले आहे. हळदीपासून फेस पॅक तयार करण्यात आले. पचनक्रिया सुधारण्यासाठी हळदीपासून तयार खास काढे तयार केले आहेत. हृदयरोगावर प्रभावी असे औषध तयार केले आहे. काढे आणि हृद्यरोगावरील औषधाला भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाकडून परवाना जारी करण्यात आला. या संशोधनाला पेटंट मिळविण्यात तो यशस्वी झाला. हळदीच्या या संशोधनात्मक कार्यात डॉ. प्रशांत झाडे, अशफाक पिंजारी, मिलन शहा, भुपेंद्र कुळकर्णी, डॉ. साईनाथ हाडोळे यांचे सहकार्य असल्याचे, असे अजिंक्यने सांगितले. तसेच त्याने गडचिरोली जिल्हयात वैदू क्‍लस्टर तयार करण्यात आले. ३५ वैदू या उपक्रमाशी जुळले आहेत. त्यांच्या उपचार प्रणालीतील औषधींच्या सुरुवातीला प्राणी व त्यानंतर मानवी चाचण्या घेण्यात आल्या. या औषधांच्या विक्रीतून मिळणारी रॉयल्टी वैदूंना दिली जाते.

वयाच्या ३१ व्या वर्षी तब्बल ३५ पेटंट मिळविण्यात अजिंक्‍य यशस्वी झाला आहे. यातील तब्बल ११ पेटंट हे त्याच्या हळद क्षेत्रातील संशोधन कार्याला मिळाले आहेत. अभियांत्रीकी क्षेत्रातील संशोधनासाठी तब्बल २० पेटंट त्यांनी मिळविले आहेत. त्यामध्ये पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही इंधनावर काम करणारे अभिनव इंजिन
त्यांनी विकसिचहापासून तयार केले बायोडिझेल त केले आहे. एवढ्यावरच न थांबता ३०० पेक्षा अधिक लोकांना त्यांनी पेटंट मिळवून दिले आहेत. पदमविभूषण रघुनाथ माशेलकर यांचे या वाटचालीत मोठे योगदान आहे.

अजिंक्‍य कोत्तावार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

SCROLL FOR NEXT