Pest Management : पाटील यांच्या नावीन्यपूर्ण कीटक सापळ्यास पेटंट

जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ (ता. चोपडा) येथील संशोधक शेतकरी कांतिलाल भोमराज पाटील यांनी प्रभावी व अल्प खर्चात प्रभावी कीड नियंत्रण करणारा ‘इकोपेस्ट ट्रॅप’ या नावाचा सापळा विकसित केला आहे.
Insect Trap Patient
Insect Trap PatientAgrowon

नाशिक : जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ (ता. चोपडा) येथील संशोधक शेतकरी कांतिलाल भोमराज पाटील (Kantilal Bhomraj Patil) यांनी प्रभावी व अल्प खर्चात प्रभावी कीड नियंत्रण करणारा ‘इकोपेस्ट ट्रॅप’ (Insect Trap) या नावाचा सापळा विकसित केला आहे. त्यासाठी भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून त्यांना नुकतेच पेटंट बहालही करण्यात आले आहे. रसशोषक किडी व शत्रूकिडीच्या पतंगांचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उपयोगी या सापळ्यांचे महत्त्व व प्रसार अजून वाढण्यास त्यामुळे मदत मिळणार आहे.

पिकांवर किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढता असल्याने शेतीमालाच्या उत्पादकतेसह गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील मंगरूळ (ता. चोपडा) येथील संशोधक शेतकरी कांतिलाल भोमराज पाटील यांनी प्रभावी व अल्प खर्चाचा प्रभावी कीड नियंत्रण करणाऱ्या सापळ्याच्या निर्मितीसाठी २०१४ मध्ये काम सुरू केले. २०१७ मध्ये निर्मिती झाल्यानंतर ‘अ नोवेल इकोपेस्ट ट्रॅप फॉर एग्रीकल्चर पर्पज’ या नावाने १९ जानेवारी २०१८ मध्ये भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडे अर्ज करण्यात आला होता. त्यास शुक्रवारी (ता. २१) रोजी पेटंट मिळाले आहे.

Insect Trap Patient
Mixed Cropping : प्रयत्नपूर्वक शेतीतून समृद्धी अन् समाधान

कांतिलाल पाटील २००० मध्ये रसायनशास्त्र शाखेत शिक्षण घेत होते. त्या वेळी थोरल्या बंधूंचे निधन झाल्याने पुढे शेतीची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली. कीडनियंत्रणसाठी त्यांनी चिकट सापळे, प्रकाश सापळे व कामगंध सापळे यांचा वापर सुरू केला; मात्र त्या प्रत्येकासाठी लागणारा खर्च अधिक होता. यावर किमान खर्चात कीड नियंत्रण करणारे तंत्रज्ञान कसे शक्य होईल यावर त्यांनी संशोधन सुरू केले होते.

त्यानुसार विविध पिकात उपयोगी ठरू शकेल अशा ‘इकोपेस्ट ट्रॅप’ची निर्मिती करण्यात पाटील यांना यश आले. त्यातून रसशोषक किडी, फळमाशी, अळींवर्गीय पतंग यांचे नियंत्रण शक्य झाल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले. याबाबत कृषी अधिकारी अनिल भोकरे, कृषी विद्यान केंद्र जळगावचे कीटकशास्त्र विषय विशेषज्ञ डॉ. हेमंत बाहेती यांनी या कामाचे कौतुक केल्याने त्यांच्यामध्ये उमेद निर्माण झाली. त्यामुळे हा सापळा इतरांना उपलब्ध करून द्या, असे सांगितल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये विस्तार झाला.

सापळ्याबद्दल २०१७ मध्ये जळगाव येथे राष्ट्रीय परिषेदत सादरीकरण केले. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (नवी दिल्ली), अखिल भारतीय कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) व कृषी विज्ञान केंद्र, मुमराबाद (जळगाव) यांच्या वतीने आयोजित ‘कृषी यांत्रिकीकरण दिवस’ निमित्ताने क्षेत्रीय प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. याकरिता ‘नवोन्मेश संशोधक शेतकरी’ या पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे.

२०१८ मध्ये अटारी (पुणे) व कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (पुणे) येथे प्रयोगशील शेतकरी संमेलनात सादरीकरण झाले. याशिवाय वीर नर्मद साउथ गुजरात विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय परिसंवादात सादरीकरण केले आहे. अखेर संशोधनास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मिळवण्यात पाटील यशस्वी झाले आहेत. कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

कृषी विभागाचे प्रोत्साहन व ‘ॲग्रोवन’ने दिले व्यासपीठ

सापळा विकसित केल्यानंतर ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून २०१९ मध्ये तंत्रज्ञानसंबंधी माहिती ‘टेक्नोवन’ सदरात प्रकाशित झाली होती. त्यामुळे हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. तर कृषी विभागाने त्यास पाठबळ दिल्याने आपला आत्मविश्वास वाढला, असे कांतिलाल पाटील सांगतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com