Kolhapur Market Yard : कोकणातून सर्वाधिक आंबा कोल्हापूर बाजारसमितीत येत असते याचबरोबर कर्नाटकमधूनही या बाजारसमितीत आंब्याची मोठी आवक होत असते. दरम्यान शेती उत्पन्न बाजार समितीच्या शाहू मार्केट यार्डात कोकणी हापूससोबत दक्षिणेतील आंब्याची आवक सुरू आहे. याच संधीचा फायदा घेत देवगड हापूस आंबा नावाच्या बॉक्समध्ये दक्षिणी हापूसचे स्वस्त आंबे मिसळून विकले जात असल्याचे शहरात संशय व्यक्त केला जात आहे.
देवगड तालुक्यात दोनशे ते अडीचशेवर आंबा बागा आहेत. त्यातून कोल्हापुरात हजारच्या आसपास पेट्या येतात. परंतु, हंगाम सुरू झाल्यापासून हंगाम संपेपर्यंत देवगड हापूस आंब्याचे बॉक्स भरभरून विकले जातात. आवक कमी असुनही देवगड हापूस एवढा कसा विकला जातो हा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत ग्राहकांनी आंबा खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करण्याची गरज आहे.
यार्डात सध्या कोकणी हापूस आंब्याची आवक वाढली आहे. यात सावंतवाडी, मालवण, कुडाळ, देवगड तसेच रत्नागिरी, राजापूर, लांजा साखरपा, देवरूख आदी भागांतून कोकणी हापूस आंब्याची आवक होते. यार्डातील बहुतेक परवानाधारक विक्रेत्यांकडे अस्सल कोकणी आंबा जरूर मिळतो. त्यांच्याकडून कोकणीसह दक्षिण भारतीय आंबा खरेदीही केला जातो.
यात खानापूर (बेळगाव), कारवार, धारवाड, दांडेली मद्रासी हापूस, केरळी हापूस आंबाही कोकणी हापूसच्या तुलनेत निम्म्या भावात विकला जातो. कोकणी हापूस दक्षिण हापूस दिसायला सारखा असल्याचा लाभ उठवत काही मोजकेच विक्रेते कोकणी व दक्षिणेतील हापूस आंबे मिक्स करून देवगड हापूस, अशी अक्षरे लिहिलेल्या बॉक्समधून विक्रीस ठेवतात.
यात ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे दिसते. कोकणातील हापूस बॉक्सची सव्वादोनशे ते तीनशे रुपयांना विक्री होते. दक्षिणेकडील हापूस घाऊक बाजारात शंभर दीडशे रुपयांना आहे. यातही दर कमी अधिक होऊ शकतो.
याबाबत विक्रेते यासिन बागवान म्हणाले, “घाऊक बाजारात बहुतांश आंबा कोकणातून येतो. त्यावर ज्या- त्या गावांचे नाव लिहिलेले असते कर्नाटकातील आंबा कमी प्रमाणान येतो. अशा आंब्याची विक्री होते देवगड हापूस नावाचा बॉक्स असत तरी आंबा खायला चांगला असल्य ग्राहकांची त्यालाही पसंती आहे."
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.