Farm Hut Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Rural Story : मळ्यातले घर आले कामी

Rural Politics : गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार असे प्रभाकरला जेव्हा समजले तेव्हा प्रभाकरने गावात लोकांशी संपर्क करून आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू केला.

शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad Article : एका गावात प्रभाकर नावाचा एक शेतकरी राहत होता. प्रभाकर हा गावात शेती करता करता पुढारी म्हणून काम करीत होता. गावात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार असे प्रभाकरला जेव्हा समजले तेव्हा प्रभाकरने गावात लोकांशी संपर्क करून आपले वर्चस्व स्थापन करण्यासाठी अटोकाट प्रयत्न सुरू केला.

नेमके ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाकरच्या वॉर्डात दुसऱ्या संवर्गासाठी आरक्षण आल्यामुळे प्रभाकरला निवडणुकीचा अर्ज भरणे शक्य नव्हते, म्हणून प्रभाकरने लगेच गावच्या एका वाडीवरील वॉर्डातून अर्ज भरण्याचे ठरविले.

वाडीमध्ये प्रभाकरचे शेत असल्यामुळे एका रात्रीत गोठ्यात तो झोपायला जायला लागला. प्रभाकरच्या मित्रांनी त्याला विचारले, ‘‘अरे, असा अचानक, कसं काय तू राहायची जागा बदललीस?’’ त्यावर प्रभाकरने सांगितले, की रानात फार चोरटे येतात.

तसेच रानात रानटी जनावरे सुद्धा पिकांचे रात्रीला नुकसान करतात, त्याकरिता राखण म्हणून मी एक, दोन महिने तिकडेच राहणार आहे. शेवटपर्यंत प्रभाकरने रानातल्या गोठ्यामध्ये झोपायला जायचे खरे कारण गावातील कोणालाही कळू दिले नाही. एवढेच नाहीतर स्वयंपाकाची काही भांडी सुद्धा त्याने वॉर्डातील घरात नेली व तिथे कधीतरी स्वयंपाक करून नवरा-बायको राहू लागले.

प्रभाकरचा हा नित्यक्रम झाला होता. निवडणुकीचा फॉर्म भरावयाचा कार्यक्रम जाहीर झाला. शेवटच्या दिवशी प्रभाकरने वाडीच्या प्रभागातून फॉर्म भरला. विरोधकांनी त्याचे घर गावात असून, मतदार यादीत नाव सुद्धा गावठाणात असल्याची तक्रार केली. त्याविरुद्ध प्रभाकरने माझी शेती वाडीत असून वाडीवरील फार्महाउसवर आपण राहतो असे फोटो व पुरावे सादर केले.

निवडणुकीचा अर्ज भरतेवेळी प्रभाकर वाडीवरच राहत असल्याचे स्थळपाहणी अंती तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून सिद्ध झाले. त्यामुळे प्रभाकरला फार आनंद झाला.

ग्रामपंचायत निवडणुकीतला प्रभाकरचा अर्ज मात्र तो वाडीवरच राहत असल्याचे सिद्ध झाल्यामुळे वैध ठरविण्यात आला होता व प्रभाकरचे इतक्या दिवसांचे कष्टाचे सार्थक झाले होते.

तात्पर्य काय, तर प्रॉपर्टी असल्याचा फायदा कोण नेमक्या कोणत्या कारणांसाठी करून घेईल ते सांगणे अवघड आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT