Moringa Farming
Moringa Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Santosh Dukre story: शेवग्याच्या शेंगा आणि फाट्यावरचा गुरूजी

संतोष डुकरे 

Santosh Dukre Story रामा अन् काभा एकमेकांची डोकी खाजवितच मोठे झाले. प्रश्नच असे पडायचे की मेंदु थंड होईपर्यंत गणगण मिटायची नाही. शाळा झाली. कॉलेजला आम्ही त्यांना फुले 1, फुले 2 म्हणायचो. कारण हे गणपतराव जवळकर नसतील एवढे सत्यशोधक. हे एक तर कृषी संशोधक (Agriculture Research) होणार, नाही तर सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन करणार ही आमची अटकळ.

Chemistry with Soil की Buried in soil for takeoff असं काहीतरी होतं. पण गडी शेतीत उतरले. ऊस बीस सोडून नवीन पिक घ्यायचं संशोधन सुरु झालं. सांगली, अकलूज, सिन्नर, नाशिक पर्यंतचा भाग पिंजून काढला आणि ठरलं... बहुगुणी, बहुउपयोगी, घाटी कल्पवृक्ष शेवगा लावायचा.

दीड फुट एकसमान वाढेल, चिकणी दिसेल, एक्स्पोर्टला चालेल अशा शेंगांच्या वाणाचे बी पैदा केलं. पण रोपं तयार करायची तर काका आडबाजूनं आडवा गेला. भावकीत एकाकडं गणपतीची पुजा झाली. पुजेला काका होताच.

गप्पा टप्पा चाललेल्या. काभ्याच्या म्हताऱ्यानं पोरांनी चालवलेल्या शेवग्याच्या उद्योगाचा विषय काढला आणि गुरुजी शिंकला.

नाही नाही नाही. काहीही करा, पण शेवगा लावू नका. पैसा मिळलंही मिळाला तर. पण सुख शांती गेली तर काय उपयोग. शेवगा लागवड म्हणजे गृहकलह, भांडणं. अधोगतीला निमंत्रण. विषय तेवढ्यावरच थांबला. पण वडीलधारी गणगण कायम राहीली.

उद्या बी लावायचं तर काभ्याचं म्हतारं रात्रीच नाय नाय म्हणाया लागलं. का... तर त्यानं भलं नाय होणार. काभा पिसाळायची वेळ... लोकांनी लाखो कमवलेत. कमवताहेत.

काभा समजवायला लागला तशी त्याची आई बापाच्या बाजूनं मैदानात उतरली. नाही. तरास व्हईल असं कायच नको आपल्याला. काभानं डोकेफोड केली. रामाही दमला पण जुगाड बसंना. एकच ठेका... शेवगा नगं म्हण्जी नगं.

या लोकांना समजत कसं नाही. ज्याला शेतीतला ध चा म कळत नाही तो सांगतोय कोणतं पिक घ्यायचं नाही ते. स्वतःच्या मेंदूने विचार का करत नाहीत.

असं वाटतं की सडके सल्ले देणाऱ्या लोकांची पाठाडं शेवग्याच्या शेंगांनी झोडून काढावी. पण त्यानं प्रश्न मिटणार नव्हता. मेंदूवरील गुलामीची गोधडी आणखी बुजगरली जाणार होती.

शेवटचा पर्याय म्हणून काभानं डोकं लढवलं. सत्यनारायणही निट वाचता येत नाही त्या काकापेक्षा दुसरा चांगला काका बघा म्हणे. मग कोणाकडं जायचं याचा काथ्याकूट होवून फाटा फायनल झाला.

रामानं रातचंच गुरुजी गाठला. सेटलमेंट केली. सकाळी गुरुजी पोपटावाणी बोलायला लागले. अरे वा वा वा वा... तुमच्या मुलाची कुंडली आणि शेवगा यांचं मोठं सौख्य आहे. काही अडचण नाही. बरकत होईल.

काकाचा कौल मिळाला तेव्हा कुठं म्हतारा म्हतारीचा जिव भांड्यात आणि शेवगा वावरात पडला. एकरभर शेवगा लागला. किलोला 38-40 रुपये बाजार भेटला. अडीच तिन लाख झाले. आता कोणतंही नवं पिक घेण्याआधी फाट्याच्या काकांनी कौल दिलाय असं काभा घरी सांगतो.

मग त्याला कुणी काही आडकाठी करत नाही. सुभ जाळला म्हणजे प्रश्न मिटतोच असं नाही. त्याचा पिळही कधी कधी जिवघेणी अडचण करतो. काभा त्या पिळाचाही पॉझिटिव्ह वापर करुन घेतोय. अधून मधून गुरुजींना शेवग्याच्या शेगांचा वाणवळा घेवून जातोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT