sangli flood agrowon
ॲग्रो विशेष

Sangli flood : कृषी अधिकाऱ्यांचा पीक नुकसानीकडे कानाडोळा, ओढ्याच्या शेतीचे पंचनामेच नाहीत

Sangli Farmers : सांगली जिल्ह्यात जुलैमधील पडलेल्या पावसामुळे भुईमूग, सोयाबीन, भात व ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

sandeep Shirguppe

Crop Loss Sangli Flood : सांगली जिल्ह्यातील नेर्ले, कासेगाव परिसरात जून, जुलै, तसेच ऑगस्ट मधील पडणाऱ्या संततधार पावसामुळे भुईमूग, सोयाबीन, भात व ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणची शेती पाण्याखाली गेली असून शेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे केले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

कृष्णा नदीच्या परिसरातील शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी वरवरची पाहणी केल्याने ओढ्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतीकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

नेर्ले, कासेगाव, कापूसखेड, तसेच महामार्गाच्या पश्चिमेकडील भागातील शेतीत पावसाचे पाणी साचल्यामुळे पिके कुजली आहेत. भात, सोयाबीन व लागण केलेला ऊस हे पीक हातातून जाणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. काही शेतकऱ्यांची ऊस लागण पाण्यामुळे गेली आहे. नेर्ले-तांबवे, नेर्ले-कासेगाव, नेर्ले-बहे, नेर्ले-येवलेवाडी, नेर्ले-कापूसखेड, नेर्ले-दंडभाग आदी भागात पाणी साचून शेतीचे नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

परिसरात नदी नसली तरी ओढ्यातून आलेल्या पाण्याच्या प्रभावाने शेती नुकसान झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी शेतामध्ये भात, भुईमूग, सोयाबीन आदी पिके घेतली आहेत. परंतु जून ते जुलैमध्ये पंधरा ते वीस दिवस पडलेल्या पावसामुळे शेताचे तळे झाले आहे, तर कृष्णा नदीला आलेला पुरामुळे देखील शेतीचे नुकसान झाले.

या परिसरातील ओढे-नाले मोठ्याने वाहून आल्यामुळे नेर्ले येथील माळी मळ्यात घर व शेतात पाणी शिरले. बिरोबा बन भाग, भिवा रावजी मळा, डायरेक्टर मळा आदी भागात देखील शेती पाण्याखाली गेली आहे. अद्यापही या शेतीचे पंचनामे प्रशासनाकडून न झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

लवकरात लवकर या परिसरातील पंचनामे व्हावेत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. सध्या पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन व भात, ऊस पिके अजूनही पाण्यात असून या ठिकाणचे पंचनामे तत्काळ करावेत, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

आमची शेती नदीकाठी नसली तरी संततधार पडणाऱ्या पावसाने ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह खूप होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीत पाणी साचून नुकसान झाले आहे. अद्याप शेतीत पाणी आहे. पंचनामे करावेत, अशी आमची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

SCROLL FOR NEXT