Manikrao Kokate agrowon
ॲग्रो विशेष

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना सहकार विभागकडून नोटीस; कर्ज वाटपात अनियमितता प्रकरण

Agriculture Minister Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह २५ माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Nashik District Bank Loan Fraud : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३४७ कोटींच्या कर्ज वाटपातील १८२ कोटींच्या अनियमितता आढळून आली आहे. याप्रकरणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह २५ माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. कृषिमंत्री कोकाटे यांच्यासह आमदार दिलीप बनकर, नरेंद्र दराडे, खासदार शोभा बच्छाव, आमदार राहुल ढिकले आणि डॉ. राहुल आहेर यांचाही यामध्ये समावेश आहे. यामुळे नाशिकमधील अनेक मोठ्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज वाटपाबाबत अनियमितता झाल्याबाबत मागच्या २ वर्षांपासून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सहकार विभागाकडून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह २५ जणांना नोटीस बजावली आहे. २ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २ सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. नाशिक जिल्हा बँक यापूर्वीच आर्थिक अडचणीत सापडली असून याप्रकरणाने पुन्हा अडचणीत भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान कर्ज वाटपाच्या प्रकरणात अनियमितते प्रकरणी माजी संचालकांची चौकशी होणार आहे.

सहकार विभागाचे कक्ष अधिकारी सोपान आरोटे यांनी २५ संचालकांना नोटीस बजावली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम १५२ अन्वये दाखल अपिल अर्जावर सुनावणी घेण्याची ही नोटीस आहे. जिल्हा बँकेतील कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी कलम ८८ अंतर्गत याची चौकशी केली होती.

कर्जवाटपात अनियमीतता असलेल्या रक्कमा

माणिकराव शिंदे (०.६७) , माणिकराव कोकाटे (१.८७), नरेंद्र दराडे (८.८९), देविदास पिंगळे(८.६५), दिलीप बनकर (८.६५), राजेंद्र भोसले (८.७८), राघो अहिरे (८.८९), सुचेता बच्छाव (२.११), चंद्रकांत गोगड (१.३२), दत्ता गायकवाड (०.६७), नानासाहेब पाटील (८.७८), राजेंद्र डोखळे (८.८९), संदीप गुळवे (७.५७), शोभा बच्छाव (२.११), जे. पी. गावित (७.२१), माणिकराव बोरस्ते (७.०२), धनंजय पवार (७.५७), शिरिष कोतवाल (१.९८), वैशाली कदम (८.५४), वसंत गिते (१.८९), राहुल ढिकले (८.७६), गणपतराव पाटील (८.८९), डॉ. राहुल आहेर (०.४३).

कृषीमंत्री वादाच्या भोवऱ्यात

हल्ली भिकारीसुद्धा १ रुपया घेत नाही; पण आम्ही शेतकऱ्यांना १ रुपयात पीक विमा देतोय, असे वादग्रस्त वक्तव्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. पीक विमा योजनेतील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने बोलताना या अवमानास्पद टिपणीमुळे राज्यभरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच सदनिका घोटाळ्यामध्ये नाशिक सत्र न्यायालयाने त्यांना २ वर्षांची सक्त मजुरी आणि ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: पुरंदरमधील वाटाणा उत्पादक अडचणीत

CM Devendra Fadnavis: नाशिकला बदलण्याची आमच्यामध्ये ताकद: फडणवीस

Misbranded Pesticide Case: ...तर विक्रेते-मार्केटिंग कंपन्या दोषी नाहीत!

Strawberry Farming: घनवटवाडीत स्ट्रॉबेरीच्या पिकाची गोडी

Sugar Rate: दरातील घसरणीमुळे साखर उद्योगात चिंता

SCROLL FOR NEXT