Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा; अपात्रतेची कारवाई तूर्त टळली

High Court : ४ घरे लाटल्याच्या प्रकरणात नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयाने मागच्या १ महिन्यापूर्वी २ वर्षांचा कोठडी आणि ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता.
 Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao KokateAgrowon
Published on
Updated on

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांचा शिक्षेचा खटला चर्चेत आहे. सरकारी सदनिका लाटल्याच्या प्रकरणात नाशिक येथील दंडाधिकारी न्यायालयाने कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठवला. यावर सत्र न्यायालयाच्या निर्णयात उच्च न्यायालयानेही मंगळवारी (ता.१८) यावर स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाने मंत्री कोकाटे यांच्यावरील अपात्रतेची कारवाईला तुर्तास दिलासा मिळाला आहे.

मुंबई हायकोर्टातील न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. यावेळी, अंजली राठोड या प्रकरणात तक्रारदार नसल्याने ही याचिका करण्याचा त्यांना अधिकार नाही. तसेच त्यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही, असे कोकाटे यांच्याकडून न्यायालयाला सांगण्यात आले. तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सत्र न्यायालयाच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सत्र न्यायालयाच्या आदेश कायम ठेवला.

 Agriculture Minister Manikrao Kokate
Agriculture Minister Manikrao Kokate: खते लिंकींगमुळे शेतकरी हैराण – कृषिमंत्र्यांची कबुली!

जिल्हा सत्र न्यायालयाची टीप्पणीची चर्चा

माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर मतदार संघाचे आमदार आहेत. यावर कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणाची जोरदार चर्चा झाली होती. 'मतदारांनी कोकाटे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना आमदार केले आहे. परंतु, या निर्णयाच्या आधारे त्यांना अपात्र ठरवण्यात आले तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, त्यासाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक खर्च होतील. असे  निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवले होते. यावर विरोधकांनी जोरदार आवाज उठवला होता.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दंडाधिकारी न्यायालयाने २० फेब्रुवारी २०२५ रोजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह भाऊ सुनिल कोकाटे यांच्यावर दोन वर्षांचा कारावास तसेच ५० हजारांचा दंड ठोठावला होता. यावर माणिकराव कोकाटे आणि सुनिल कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल करत शिक्षेला स्थगिती मिळवली होती. यावर कोकाटे यांना मोठा दिलासा मिळाला होता.

कोकाटेंकडून संताप

नाशिकमध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या निकालावर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटे संताप व्यक्त केला. निकाल अद्याप लागलेला नाही, स्थागिती देण्यात आली आहे. विरोधक, मिडीयाकडून तेच तेच सुरु आहे. न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे हा मुर्खपणा असून राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरु असल्याचे म्हणत माणिकराव कोकाटे यांनी संताप व्यक्त केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com