Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Bail Pola : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी साजरा केला जन्म गावी बैलपोळा सण

Agriculture Minister Dhananjay Munde : आज बैलपोळ्या निमित्त उपस्थित राहून आपल्या शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांसमवेत पारंपरिक पद्धतीने पूजन केले व बळीराजाचा जोडीदार असलेल्या बैल जोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला.

Team Agrowon

Parali News : महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपले जन्मगाव नाथरा ता. परळी वै. येथे आज बैलपोळ्या निमित्त उपस्थित राहून आपल्या शेतातील बैल जोड्यांचे कुटुंबीयांसमवेत पारंपरिक पद्धतीने पूजन केले व बळीराजाचा जोडीदार असलेल्या बैल जोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य भरवला.

बैलपोळ्याच्या निमित्ताने मराठवाड्यात बैलांची पूजा करताना पाऊस आल्याची चाहूल लागल्याचे एक खास गीत म्हटले जाते, "चाहुर चाहुर चांग भलं, पाऊस आला घरला चला" अशा आशयाचे हे ग्रामीण गीत बैलजोड्यांचे पूजन करताना स्वतः धनंजय मुंडे सुद्धा हे म्हणताना पाहायला मिळाले!

देशाच्या समृद्ध कृषी परंपरेमध्ये बळीराजाच्या सोबतीने किंबहुना बळीराजाच्या बरोबरीने कष्ट उपसणाऱ्या बैलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा हा सण असून या निमित्ताने राज्यातील समस्त शेतकरी बांधवांना आपण शुभेच्छा देतो, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रसंगी धनंजय मुंडे यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मुंडे, बंधू अजय मुंडे व अभय मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

नुकसानीचा घेतला आढावा

दरम्यान ग्रामीण भागात बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा केला जात असताना आपली पारंपारिक प्रथा जपत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आजच कृषी विभागाच्या दोन बैठकांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केले.

याशिवाय मागील दोन-तीन दिवसापासून बीड जिल्ह्यासह राज्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचाही ऑनलाइन बैठकीत अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला, तसेच आवश्यक त्या ठिकाणी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर मनुष्यहानी, पशुहानी होणार नाही, या पद्धतीने आपत्ती व्यवस्थापन करण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणाना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT