Dhananjay Munde Agrowon
ॲग्रो विशेष

Dhananjay Munde : उद्याच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान ६५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंची पुन्हा ग्वाही

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगामातील अनुदान अद्याप मिळालेले नाही. राज्य सरकारकडून तारीख पे तारीखचा खेळ सुरूच आहे. तर रविवारी (ता.२९) कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल असाही दावा कृषी विभागाने केला होता. पण आता सोमवारी (ता.३०) कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच मुंडे यांनी, सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना १० हजार दिले जातील, असेही म्हटले आहे. तर याचा फायदा सुमारे ६५ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केला आहे.

राज्य सरकराच्या कृषी विभागाकडून रविवारी २०२०, २०२१ आणि २०२२ सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून भाष्य केले.

यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. या ६८ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मंजूर केले जाईल. प्रतिहेक्टरी ५ हजार २ हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांमध्ये २ हजार ५०० कोटींचे वितरण सोमवारी केले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे.

यावेळी मुंडे म्हणाले, शेतकर्‍यांच्या आनंदात आपला आनंद असून आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. कारण त्यांनी कमी वयात आपल्याला कृषिमंत्र्यालयाची जबाबदारी दिली. यामुळेच आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखता आल्या. तर शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपले राज्य देशात चांगले कृषि राज्य बनल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान याच कार्यक्रात राज्यपालांनी कमी वेळ दिल्यावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला होता. तर गोंधळ वाढल्याने कार्यक्रम काही काळ थांबवण्यात आला होता. पण राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपण सर्वांनाच पुरस्कार देऊ, असे आश्वासन दिल्यानंतर आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर कार्यक्रम सुरू झाला. हा कार्यक्रम मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bogus Fertilizer : बोगस निविष्ठा प्रकरणात कृषी विभागाची भूमिका संशयास्पद

Cotton Productivity : सघन कापूस लागवड उत्पादकता वाढीस पूरक

Rabi Season 2024 : रब्बीसाठी तीन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित

Agriculture Awards : सरकारच्या कृषी पुरस्कार गोंधळ; शेतकऱ्यांच्या रोषानंतर कार्यक्रम सुरू

Crop Insurance : शेतकऱ्यांना पीकविम्याची भरपाई द्यावीच लागेल

SCROLL FOR NEXT