Canal  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : डावा कालव्यावरील शेतीला पूर्वीप्रमाणेच पाणी

काळम्मावाडी धरणाच्या डावा कालव्यातून पिकांना पाणी सोडले जाते. कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण होताच कालव्यातून ओढ्याद्वारे सोडले जाणारे पाणी बंद होणार होते.

Team Agrowon

Kolhapur News : काळम्मावाडी धरणाच्या डावा कालव्यावरील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच शेतीला पाणी (Agriculture Irrigation) दिले जाईल. कालव्याजवळ असणाऱ्या ओढ्याच्या ठिकाणी अस्तरीकरण होणार नाही. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिली.

तुरंबे (ता. राधानगरी) येथील सिद्धिविनायक मंदिराशेजारी शेतकऱ्यांच्या बैठकीत आबिटकर बोलत होते. लढ्याला यश आल्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार आबिटकर आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांचे आभार मानले.

काळम्मावाडी धरणाच्या डावा कालव्यातून पिकांना पाणी सोडले जाते. कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण होताच कालव्यातून ओढ्याद्वारे सोडले जाणारे पाणी बंद होणार होते.

यामुळे दहा गावांतील शेतकऱ्यांची पिके धोक्यात होती. तिटवे, अर्जुनवाडा, तळाशी, चंद्रे, निगवेमधील शेतकऱ्यांनी बैठक घेतली होती, तर पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विनया बदामी, कल्याणी कालेकर यांची भेट घेऊन ओढ्याचे पाणी बंद करू नका, असे लेखी निवेदन दिले;

मात्र आश्वासन मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. अधीक्षक अभियंता महेश सुर्वे म्हणाले, की ‘कालव्यावरील ओढ्याच्या ठिकाणी ३०० मीटरवर अस्तरीकरण केले जाणार नाही. पिकाचे नुकसान होणार नाही.’

यावेळी अरुण जाधव, शामराव भावके, अजित पवार, प्रभाकर पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT