Chemical Mixed Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crisis : केमिकल मिश्रित पाण्यामुळे हराळवाडीत शेती संकटात

Chemical Mixed Agriculture : मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील ग्रामस्थ, शेतकरी हे या परिसरातील साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त पाण्याने हैराण झाले आहेत.

Team Agrowon

Solapur News : मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील ग्रामस्थ, शेतकरी हे या परिसरातील साखर कारखान्याच्या केमिकलयुक्त पाण्याने हैराण झाले आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, शिवाय शेतीही धोक्यात आली आहे. याबाबत ग्रामस्थांनी लोकायुक्त, पर्यावरण मंत्री आणि न्यायालयाकडे तक्रारीचे निवेदन दिले आहे.

रात्री-अपरात्री हराळवाडी, कोरवली, जामगाव, कामती बुद्रूक या भागांत साखर कारखान्यातील रसायन मिश्रित केमिकल युक्त घाण पाणी सोडले जात आहे. ज्या शेतात रात्री कुणी नाही, अशा ठिकाणी साखर कारखान्याद्वारे टँकरद्वारे केमिकल पाणी आणून रस्त्याकडेला शेतामध्ये सोडून टँकरधारक पळ काढतात.

त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या पाण्याचा पाझर परिसरातील विहीर, बोर आणि कॅनॉलवर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतीबरोबरच जनावरांसह माणसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तत्काळ शासनाने केमिकलयुक्त पाणी सोडणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मळीच्या नावाखाली हे पाणी सोडले जाते, पण त्यात विविध प्रकारच्या केमिकलची भेसळ आहे. त्याचा दुष्परिणाम पिकांवर होणार आहे. याबाबत जागृती व्हायला हवी. चुकीचे काही होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी कारखान्याची आहे. प्रदूषण मंडळाने दखल घेऊन कारवाई करावी.
माउली हेगडे, ग्रामस्थ हराळवाडी
या मळीची मोठी दुर्गंधी येते. अक्षरशः आम्हाला उलटी होते, पण कोणीच त्याची दखल घेत नाही. कारखान्याने त्यावर उपाय शोधावा, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
महिंबर शेळके, ग्रामस्थ हराळवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकऱ्यांना वीज अनुदान, धानासाठी प्रति क्विंटल २,७०० रुपये हमीभाव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

Flower Growers: पातूरच्या शेतकऱ्यांनी जोपासली फुलशेतीची परंपरा

Pokhara 2.0 Scheme: पोकरा 2.0 अंतर्गत हरितगृह, शेडनेटमधील भाजीपाला व फुलांना सहाय्य; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

Rural Development: कल्पनाताईंनी समर्थपणे सांभाळली ‘ग्राम गौरव’ची धुरा

Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT