Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Drone : ड्रोनचा प्रभावीपणे वापर करावा : कुलगुरू डॉ. मणी

Agriculture Management : शेती ही नियोजनबद्ध व काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करणेही आवश्यक आहे. ड्रोन हे त्यापैकीच एक तंत्रज्ञान.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : शेती ही नियोजनबद्ध व काटेकोरपणे करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब करणेही आवश्यक आहे. ड्रोन हे त्यापैकीच एक तंत्रज्ञान. त्याचा वापर प्रभावीपणे वापर करण्याची आवश्यकता असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केले.

कोनेवाडी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि., हसनाबादवाडी (ता. औरंगाबाद) या शेतकरी उत्पादक कंपनीला जिल्ह्यातील पहिला ड्रोन मिळाला आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत या शेतकरी उत्पादक कंपनीला ड्रोन देण्यात आला आहे.

या ड्रोनचे उद्‌घाटन डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, माजी नियंत्रक श्रीमती देवतराज तसेच लातूरचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, ‘एनएआरपी’चे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. भगवानराव कापसे, डॉ. अरुण गुट्टे, कोनेवाडी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि.चे अध्यक्ष विलास भेरे, भगवान शिंदे, ‘केव्हीके’चे प्रमुख डॉ. किशोर झाडे, विषय विशेषज्ञ डॉ. अनिता जिंतूरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ड्रोनचा शेतीसाठी वापर यासाठी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.

कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, औरंगाबादद्वारे मार्गदर्शित ही शेतकरी उत्पादक कंपनी असून, नाबार्ड आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे पीओडीएफ-आयडी फंड अंतर्गत या शेतकरी उत्पादक कंपनीची २०२० मध्ये स्थापना करण्यात आलेली आहे. या कंपनीमध्ये ३११ सभासद असून, कंपनी मार्फत सभासदांसाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT