Agriculture College  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture College : पापळ येथील कृषी महाविद्यालय अडकले लालफितशाहीत

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापळ येथे प्रस्तावित कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून लालफितशाहीत अडकला आहे. परिणामी, देशाच्या कृषी विकासात योगदान देणाऱ्या अशा महान विभूतीच्या संदर्भाने शासनाची उदासीनताही चव्हाट्यावर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यांतर्गत येणारे पापळ हे भाऊसाहेब ऊर्फ डॉ. पंजाबराव देशमुख यांचे मूळगाव. त्यामुळेच या गावाचा आदर्श गाव योजनेतही समावेश करण्यात आला आहे. याच गावात श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने कृषी महाविद्यालय प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव आठ वर्षांपूर्वी शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आला.

सुमारे ७५ एकर जमिनीचे सातबारा उतारे शासनाकडे पाठविण्यात आले. भाऊसाहेबांच्या गावात आणि नावाने होणाऱ्या या महाविद्यालयास तत्काळ मान्यता मिळत शेतकरी, शेतमजुरांची मुले या ठिकाणी प्रवेशीत होतील, अशी अपेक्षा होती. परंतु शासनस्तरावर हा प्रस्ताव गेल्या आठ वर्षांपासून मान्यतेअभावी पडून आहे. त्यातूनच शासनाची उदासीनता ही चव्हाट्यावर आली आहे.

कृषी विकासाला चालना मिळावी याकरिता भाऊसाहेबांनी प्रयत्न केले. यासाठी पहिले कृषी प्रदर्शनही त्यांनी दिल्लीत आयोजित केले होते. बहुजन समाजातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. आज रयत नंतर ही राज्यातील दुसरी सर्वांत मोठी संस्था आहे.

पापळ गावात श्री शिवाजी शिक्षण संस्थेची मोठ्या प्रमाणात जमीन आहे. त्यामुळे महाविद्यालयास मंजुरी मिळाल्यास कृषी महाविद्यालय संस्थेच्या शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर इमारतीचे बांधकाम करण्यात येणार असल्याचे श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT