Agricultural Digitization Work agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Digitization Work : शेती, निवासी जमिनीचे नकाशे क्लिकवर, डिजिटलायझेशनचे काम साठ टक्के पूर्ण

Land Records Department : भूमी अभिलेखकडून जमीन मोजणीचे काम मूळ नकाशांच्या आधारावर होते. भूमी सर्वेक्षणचे काम आधुनिक तंत्रज्ञानाने होते.

sandeep Shirguppe

Agricultural Land Maps Digitization : शेती व निवासी जमिनीचे अभिलेख नकाशे संगणकीय उपलब्ध होणार आहेत. त्याअनुषंगाने स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यात सात लाख जमिनीचे नकाशे तयार झाले असून पाच लाख नकाशे तयार करणेचे काम सुरू आहे.

तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात जुन्या अभिलेखांचे स्कॅनिंगचे काम सुरू असल्याने नकाशांचे स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन होत आहे. डिजिटल स्वरूपात नकाशे भूमापकांना उपलब्ध झाल्यावर भूमापकांना नकाशा अभिलेख क्षणात मिळणार असल्याने मोजणी प्रकरण निकाली करण्याचा वेग वाढेल.

जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख शिवाजी भोसले म्हणाले की, निवासी जमिनीचे जुन्या नकाशांची विविध कारणांसाठी आवश्यकता भासते. नकाशा सहज मिळण्यासाठी डिजिटायलेझशन होत असून जिल्ह्यात १२ लाख नकाशे डिजिटल स्वरूपात मिळतील.

भूमी अभिलेखकडून जमीन मोजणीचे काम मूळ नकाशांच्या आधारावर होते. भूमी सर्वेक्षणचे काम आधुनिक तंत्रज्ञानाने होते. तथापि, मूळ नकाशांचे अभिलेख डिजिटल स्वरूपात नसल्याने कर्मचाऱ्यांना संबंधित नकाशा अभिलेख कक्षात शोध डिजिटल करून वापरावा लागतो. या कामात भूमापकांचा खूप वेळ व श्रम वाया जातो. जुने अभिलेख शोधून नकाशे देणे जिकिरीचे व वेळखाऊ काम आहे. दिवसेंदिवस अभिलेख जीर्ण झाले आहेत.

यावर उपाययोजना म्हणून ''ई-अभिलेख'' कार्यक्रमातून अभिलेख कक्षांचे संगणकीकरणाचे काम हाती घेतले आहे. अभिलेखांचे स्कॅनिंग करून ते डिजिटल स्वरूपात साठविले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या नकाशांच्या प्रती ऑनलाइन मिळतील. दरम्यान शेतीचा कोणताही नकाशा मिळत नसेल तर १३ प्रकारचे नकाशे आहेत, यामध्ये त्या शेतीचा नकाशा मिळतोच, अशी माहिती भूमी अभिलेख सूत्रांनी दिली.

१६ प्रकाराचे नकाशे स्कॅनिंग...

भूमिअभिलेख कार्यालयात असलेले १६ प्रकारचे नकाशे स्कॅनिंग केले जात आहेत. गावानुसार टिपण, काटे फाळणी, फोडी टिपण, फाळणी नकाशा, सविस्तर भूमापन मोजणी नकाशा, सर्‍व्‍हे नंबरचे मूळ नकाशे, कापडी सर्‍व्‍हे नंबरचे नकाशे, भूसंपादन नकाशे, बंदोबस्त नकाशे, सर नकाशे, पोट हिस्सा नकाशा, गट फ्लॉट नकाशा, फेअर स्केच, कोर्ट वाटप नकाशे, गट बुक नकाशे, सिटी सर्व्हे नकाशे, बिनशेती नकाशे, ट्रॅग्युलेशन नकाशेचा समावेश आहे.

नकाशा डिजिटायझेशनचे फायदे

• मूळ नकाशांचे आयुष्य वाढेल

• नकाशांची नक्कल तत्परतेने मिळेल.

• डिजीटल नकाशे ई-महाभूमी संकेतस्थळावर मिळतील

• शासकीय जमिनीवरील अतिक्रमणावर उपाय होईल

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT