Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Satellite Technology : उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे शेती समस्यांवर मात करणे शक्य

Agriculture Issue : सध्या द्राक्ष पिकात ७०० शेतकऱ्यांसमवेत कामकाज होत आहे. यातील सकारात्मक परिणाम व संशोधन यशस्वी होऊन यश मिळाल्यानंतर पुढे कांदा व टोमॅटो यांसारख्या पिकातही त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.

Team Agrowon

Nashik News : ‘‘उपग्रह तंत्रज्ञान व शेतकऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास करून त्यांच्या समस्यांवर मात करता येणार आहे. यासाठी संशोधन करून शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न असेल. सध्या द्राक्ष पिकात ७०० शेतकऱ्यांसमवेत कामकाज होत आहे. यातील सकारात्मक परिणाम व संशोधन यशस्वी होऊन यश मिळाल्यानंतर पुढे कांदा व टोमॅटो यांसारख्या पिकातही त्याचा वापर करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामात काटेकोरपणा आणण्याचा मुख्य प्रयत्न आहे,’’ अशी माहिती इस्रो स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे कृषी विभाग प्रमुख डॉ. विमल कुमार भट्टाचार्य यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली.

मागील वर्षी सह्याद्री फॉर्म आणि इस्रो यांच्यात सामंजस्य करार झाला होता. त्यानंतर एक वर्षाच्या वाटचालीत विविध विकास व संशोधनपर कामे करण्यात आली.

त्यासंबंधी तांत्रिक आढावा बैठक गुरुवारी (ता. २२) सह्याद्री फार्मर्स येथे झाली. या वेळी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विकास शिंदे, शास्त्रज्ञ राहुल निगम, वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रशांत कुमार, वरिष्ठ मृदा शास्त्रज्ञ आयन दास, सह्याद्री सेंसर्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पराग नार्वेकर आदी उपस्थित होते.

डॉ. भट्टाचार्य म्हणाले, ‘‘सह्याद्रीशी सामंजस्य करार झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात झाली आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देण्यासह संशोधन व विकास या प्रक्रियेतून हे कामकाज पुढे जाईल. शास्त्रीय आधार व योजनापूर्वक कामकाज यातून सध्या द्राक्ष पिकावर महत्त्वाचे काम सुरू आहे. पुढील काळात शेतीत क्रांती घडेल.’’

द्राक्ष शेतीत काटेकोर पद्धतीने हवामान केंद्र आधारित कामकाज करणाऱ्या अनिल शेटे, सोमनाथ पाटील, विजय मोरे, किरण निरगुडे, गणेश कदम, लखन शिंदे या प्रयोगशील शेतकऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

‘सह्याद्री फार्म्स’तर्फे सुरू असलेल्या हवामान केंद्र आधारित तंत्रज्ञानाची माहिती डॉ. नार्वेकर यांनी दिली. ‘सह्याद्री’चे कृषीविद्यावेत्ता सचिन वाळुंज, पंकज नाठे, ‘एच स्केवर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले यासह श्रीकृष्ण गांगुर्डे, डिजिटल इम्पॅक्ट स्केवरचे संदीप शिंदे आदी उपस्थित होते.

द्राक्षशेती खर्चिक झाली आहे. त्यामुळे निर्णय घेताना काटेकोर व अचूक माहिती घेऊन काम करणे अपेक्षित आहे. या संदर्भातील सर्व घटक व स्रोतांची माहिती अचूक व वेळेवर मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आयओटी व उपग्रह या तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची असेल. सह्याद्री व इस्रो यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे ज्ञानाचे भंडार व उपयुक्त माहिती मिळण्यास सुरुवात झाली आहे.
- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात टँकरची संख्या १०७ वर

Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; क्षेत्रवाढीची शक्यता

Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका

Land Acquisition Protest: रिंग रोड भूसंपादनासंदर्भात शेतकऱ्यांचा संताप

SCROLL FOR NEXT