Lasalgaon APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mortgage Loan : लासलगाव बाजार समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी शेतीमाल तारण कर्ज योजना

Lasalgaon Market Committee : कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यामार्फत सन १९९०-९१ पासून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत बाजार समिती सन २०२३-२४ या हंगामाकरीता मका, सोयाबीन, चना व गहू या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे.

Team Agrowon

Nashik News : निफाड तालुक्यात खरीप हंगामातील मका व सोयाबीन काढणीचे काम सुरू झाले असून, शेतकऱ्यांना शेतीमाल एकाचवेळी बाजार आवारात विक्रीस येत असल्यामुळे बाजारभाव कमी होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून लासलगाव बाजार समितीने दरवर्षीप्रमाणे सन २०२३-२४ या हंगामाकरिता शेतीमाल तारण कर्ज योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली.

कृषी पणन मंडळ, पुणे यांच्यामार्फत सन १९९०-९१ पासून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत बाजार समिती सन २०२३-२४ या हंगामाकरीता मका, सोयाबीन, चना व गहू या प्रमुख शेतीमालासाठी तारण कर्ज योजना राबविणार आहे. त्यानुसार या योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच माल तारणात ठेवला जाणार आहे.

शासकीय प्रतवारीकार व बाजार समितीचे प्रतवारीकार यांनी संयुक्तरीत्या शिफारस केलेला मका, सोयाबीन, हरभरा व गहू हा शेतीमाल ज्या दिवशी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात तारण म्हणून ठेवला जाईल. त्या दिवसाचे सरासरी बाजारभाव किंवा त्या मालाचे किमान आधारभूत दर यापैकी जे कमी असेल ते विचारात घेऊन बाजार समिती वखार महामंडळाचे पावतीप्रमाणे स्वनिधीतून संबंधित शेतकऱ्यास धनादेशाद्वारे रक्कम अदा करणार आहे.

संबंधित शेतकऱ्यांचा खाते उतारा व सातबारा उताऱ्यावरील मका, सोयाबीन, हरभरा व गव्हाचे लागवड क्षेत्र व उत्पादित माल याचे प्रमाण ठरवून एकूण किमतीच्या ७५ टक्के रक्कम तारण कर्ज म्हणून ६ महिन्यांच्या मुदतीने ६ टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना अदा करण्यात येणार आहे.

त्यानंतरच्या ६ महिन्यांकरिता ८ टक्के व त्यापुढील ६ महिन्यांकरिता १२ टक्के व्याज दराने आकारणी केली जाणार आहे. १८ महिन्यांनंतर या कर्जास मुदतवाढ मिळणार नाही. कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती गणेश डोमाडे व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी बाजार समितीच्या लासलगाव मुख्य कार्यालयात अथवा ९९२१४२३५३६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Grape Crop Protection: द्राक्ष पीक वाचविण्यासाठी खर्चात चौपट वाढ

Ginning Pressing Industry: जिनिंग प्रेसिंग कारखाने दीपोत्सवानंतर धडाडणार

Raisin Market: झीरो पेमेंटसाठी बेदाण्याचे सौदे एक महिना बंद

Farmer Relief Package: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच

Maharashtra Rain: राज्यात विजांसह पावसाची अंदाज कायम

SCROLL FOR NEXT