SAATHI Portal Agrowon
ॲग्रो विशेष

SAATHI Portal: साथी पोर्टलवरील नोंदीला कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा आक्षेप

Seed Registration Mandatory: साथी पोर्टलच्या माध्यमातून बियाणे उत्पादन ते विपणन अशा सर्वच टप्प्यांवरील नोंदीची सक्ती कंपनी ते विक्रेतास्तरावर करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News: प्रमाणीतबरोबरच सत्यप्रत बियाणे देखील कायद्याच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू आहेत. त्याअंतर्गत साथी पोर्टलच्या माध्यमातून बियाणे उत्पादन ते विपणन अशा सर्वच टप्प्यांवरील नोंदीची सक्ती कंपनी ते विक्रेतास्तरावर करण्यात आली आहे. मात्र यातून विक्रेत्यांना वगळत केवळ कंपनीस्तरावरच संगणकीय नोंदीची सक्ती करावी, अशी मागणी कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा राज्यस्तरीय संघ असलेल्या ‘माफदा’ने केली आहे.

केंद्र सरकारकडून बियाणे बाजारातील गैरप्रकारावर नियंत्रणाच्या उद्देशाने सीड ऑथेंटिकेशन ट्रेसेबिलिटी ॲड होलेस्टिक इन्व्हेंटरी (साथी) पोर्टल विकसित केले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील बियाणे प्रमाणीकरण यंत्रणांना या पोर्टलच्या वापराची सक्ती करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र राज्य बियाणे प्रमाणीकरण यंत्रणेने मोठी आघाडी घेतली आहे.

बियाणे स्रोत ते बीजोत्पादक शेतकरी व विपणन अशा सर्वच टप्प्यावर प्रमाणित बियाण्यांच्या नोंदी घेत त्या संगणकावर फीड करीत क्यू-आर कोडच्या माध्यमातून त्याची उपलब्धता याद्वारे केली जात आहे. आतापर्यंत सत्यप्रत बियाणे मात्र कायद्याच्या कक्षेबाहेर होते. त्यामुळे सत्यप्रत बियाण्यांच्या माध्यमातून बेकायदा बियाणे पुरवठा होण्याची भीती व्यक्त होत होती. परिणामी आता सत्यप्रत बियाणेही कायद्याच्या कक्षेत आणले आहे. त्याअंतर्गत कंपन्यांना देखील बियाणे स्रोत ते बीजोत्पादन आणि विक्री या टप्प्यावर संगणकीय नोंदीची सक्ती करण्यात आली आहे.

त्यानंतर घाऊक आणि किरकोळ बियाणे विक्रेत्यांना देखील प्रत्येक बियाणे पाकिटांवरील लेबल क्रमांक, बियाणे खरेदी करणारा शेतकरी यासह इतर विविध प्रकारची माहिती नोंदवावी लागणार आहे. परंतु हंगामात शेतकऱ्यांची एकाचवेळी बियाणे खरेदीसाठी झुंबड होते. अशावेळी पाकिटांवरील लेबल क्रमांकासह शेतकऱ्यांची माहिती नोंदविणे अडचणीचे ठरणार आहे.

बियाणे कंपन्यांकडून बियाणे उत्पादनासंबंधी सर्व प्रकारची माहिती घेतल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांना पुन्हा माहिती नोंदविण्यास सांगणे चुकीचे आहे. बियाणे हंगाम ठरावीक कालावधीपुरता मर्यादित असतो अशात विक्रेत्यांचा नाहक वेळ खर्ची जाणार आहे. परिणामी आमच्या संघटनेने याचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभिजीत काशीकर, अध्यक्ष, नागपूर जिल्हा ॲग्रो डीलर्स असोसिएशन
बियाणे उत्पादनातील गैरप्रकार नियंत्रणासाठी साथी पोर्टलची संकल्पना योग्य आहे. मात्र बियाणे उत्पादन कंपन्यांकडून होते. त्यांच्यास्तरावरच आवश्यक ती माहिती घेतल्यानंतर कृषी विक्रेत्यांकडून घेण्याची गरजच नाही. पोर्टलवर नोंद नसलेले बियाणे विकल्यास विक्रेत्यावर कारवाईस हरकत नाही.
विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड, सीड्स डीलर्स असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Protection : शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण देणे शक्य आहे का?

Pune APMC : ...तर पुणे बाजार समितीला लागलेले ग्रहण सुटेल

Trump India Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचे आयात कर अस्त्र

Rain Crop Damage : मुसळधारेने काही तासांत होत्याचे नव्हते

Onion Rate Crisis : कशी फुटेल कांदादर कोंडी?

SCROLL FOR NEXT