Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Agrowon
ॲग्रो विशेष

Devendra Fadnavis : कृषी संजीवनी महोत्सवाचे फडणवीस यांच्या हस्ते उद्‍घाटन

Team Agrowon

Parbhani News : परभणी येथे संजीवनी मित्र मंडळाच्या वतीने स्व. अॅड. शेषरावजी धोंडजी भरोसे (आबा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कृषी संजीवनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे (Agricultural Exhibition) आयोजन गुरुवार (ता. २३) ते सोमवार (ता.२७) या कालावधीत करण्यात आले आहे.

शुक्रवारी (ता. २४) या महोत्सवाचे उद्‍घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिली.

परभणी येथील वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालय मैदानावर आयोजित या कृषी प्रदर्शनाचे यंदाचे तिसरे वर्षे आहे.

मंगळवारी (ता. १४) या कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा प्रारंभ भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके, महानगर जिल्हाध्यक्ष तथा संयोजक आनंद भरोसे यांच्या हस्ते पार पडला.

युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश देशमुख, ईव्हेट प्रमुख महेश बेद्रे, सरपंच उमाकांत भरोसे, उपसरपंच सोपान सामाले, विठ्ठल बोबडे आदी उपस्थित होते.

कृषी प्रदर्शनासाठी १० एकरवर ६ आधुनिक दालन उभारण्यात येत आहेत. त्यात २०० हून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत.

शेतीविषयक चर्चासत्र व परिसंवाद, सरपंच परिषद, धान्य महोत्सव, परभणी जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, बियाणे, सेंद्रिय शेती पद्धती, गांडूळ खतनिर्मिती, पशुखाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषिविषयक पुस्तके, ठिबक सिंचन, सोलार उत्पादने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहपयोगी वस्तू, धान्य महोत्सव असे अनेक स्टॉल लागणार आहेत.

सर्वांसाठी विनामूल्य असलेल्या या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक आनंद भरोसे यांनी केले आहे. प्रदर्शन स्टॉल बुकिंग संपर्क महेश बेंद्रे ९८८१०४५३१५, विशाल बोबडे ७७७५०४२१११.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT