Umrane Market Commttee Agrowon
ॲग्रो विशेष

Umrane Market Commttee : उमराणे बाजार समिती बंदमुळे शेतीमाल खासगी बाजारात

APMC News : उमराणे बाजार समितीत मका, कांद्याची आवक; सुटीनंतर लिलाव पूर्ववत

Team Agrowon

Umrane News : उमराणे : दिवाळीत आठवडाभर बाजार समिती बंद राहणार असल्याने परतीच्या पावसामुळे खराब होत चाललेल्या कांदा व मका येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न खासगी बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. नवीन लाल कांद्यासह उन्हाळ कांदा व मका विक्रीसाठी झालेल्या गर्दीमुळे आवकेत वाढ दिसून आली. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेला नवीन लाल कांदा तसेच मका मळणीस विलंब लागल्याने गेल्या आठ दिवसांपासून बाजारात लाल कांद्याची व मक्याची आवक रोडावली होती.

पावसाने उघडीप देताच शेतातील कांदा खराब होऊ नये म्हणून वेगाने काढून बाजार समिती विक्रीस आणला येणारा हिंद धू र्मातील सर्वात मोठा सणासाठी गाठीला दोन पैसे असावेत या भावनेने शेतकऱ्यांनी नवीन लाल कांदा तसेच संपत असलेला उन्हाळी कांदा व नवीन उत्पादित मका विक्रीसाठी एकच गर्दी केल्याने बाजार आवारात प्रचंड आवक झाली होती. पन्नास वाहन बाजारात लाल कांद्याचे सुमारे चारशे, उन्हाळी कांद्याचे पाचशे व मकाची तिनशे पन्नास वाहने बाजारात माल विक्रीसाठी दाखल झाली होती.

तर लाल कांद्याना किमान १,००० रुपये किमान ४५०० रुपये तर सरासरी २८०० रुपयांपर्यंत बाजारभाव होते. उन्हाळी कांद्यांना किमान १२०० रुपये, कमाल ४७०० रुपये व सरासरी ३२०० रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर मका किमान १८०० रुपये, कमाल २७०० रुपये व सरासरी २२०० रुपये दराने व्यापारी बांधवांनी खरेदी केला.

दरम्यान पुढील आठवड्यात सोमवारी फक्त मका लिलाव सुरु राहील अशी माहिती बाजार समिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली दिवाळी सणामुळे सोमवार ( ता.२८) ते ४ नोव्हेंबर पर्यंत बाजार समितीचे कामकाज बंद असेल. मंगळवार ( ता.५) नोव्हेंबर पासून पुर्ववत लिलाव सुरु होणार आहेत.

- नितीन जाधव, सचिव, बाजार समिती नामपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ginger Rate: आले पिकाच्या दरात घट

Pomegranate Production: देशाच्या डाळिंब उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा ५६ टक्के

Bhavantar Yojana: सोयाबीनसाठी भावांतर योजना राबवा

Agricultural Damage: अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टरवर पिकांना फटका

Maharashtra Rain Forecast: उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT