Agricultural Assistants Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Assistants Protest: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहायकांचे धरणे

Agri Staff Demands: कृषी सहायकांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने राज्यभरात कृषी सहायकांनी धरणे आंदोलन छेडले आहे. गुरुवारी ते सामूहिक रजेवर जाणार असून शुक्रवारी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News: कृषी सहायकांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने राज्यात कृषी सहायकांनी आंदोलन सुरू केले आहे. अहिल्यानगर, अकोला, परभणी, नांदेड, अहिल्यानगर त्याचबरोबर राज्यभरातील कृषी कार्यालयांच्या प्रागणांत बुधवारी (ता. ७) कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले.

अहिल्यानगरला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे यांनी भेट देऊन कृषी सहायकांशी चर्चा केली. राज्य कृषी सहायक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष धनराज गुंड, तालुका अध्यक्ष युवराज शिंगटे, सचिव उमेश शेळके, शेखर काळे, शुभम काळे व कृषी सहायक उपस्थित होते.

आज सामूहिक रजेवर जाणार

कृषी सहायक मागण्यांसाठी करत असलेल्या आंदोलनात गुरुवारी (ता. ८) एक दिवस कृषी सहायक सामूहिक रजेवर जाणार आहेत. शुक्रवारी (ता. ९) ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार टाकणार आहेत.

कृषी सहायकांच्या मागण्या...

कृषी सेवक कालावधी रद्द करून नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती देण्यात यावी.

कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी कारणे.

संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असल्यामुळे लॅपटॉप मिळावा.

ग्रामस्तरावर कामकाजासाठी तलाठी, ग्रामसेवकाप्रमाणे मदतनीस मिळावा.

निविष्ठा वाटपासंदर्भात सुसूत्रता आणावी, वाहतूक भाड्याची तरतूद करावी.

कृषी विभागाच्या आकृतिबंधास तत्काळ मंजुरी द्यावी.

कृषी सहायकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दूर करावी.

‘पोकरा’ योजनेमध्ये समूह सहायकांची पदे पूर्वीप्रमाणे भरण्यात यावी

पंचनामे व इतर बाबीत महसूल, ग्रामविकास, कृषीच्या जबाबदाऱ्यांबाबत समानता आणावी.

सिल्लोड तालुक्यातील कृषी सहायक आत्महत्येबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करावी.

कृषी सहायक संवर्गाच्या आस्थापनाविषयक अडचणीची सोडवणूक करण्यात यावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Development: कृषी आराखड्यात अधिकारी, कर्मचारी महत्त्वाचा दुवा

Use of BioFertilizers: जमिनीचा कस वाढवणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आणि त्यांचे फायदे

Silk Development: ‘रेशीम विभाग आपल्या दारी’ मोहीम राबवणार

Rural Development: नऊ गावांमध्ये विकासकामांचा दुष्काळ

Rabi Crop Management: शाश्‍वत रब्बी पीक उत्पादनासाठी मृद् व जलसंधारण

SCROLL FOR NEXT