Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory: कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Agriculture Tips: गहू, भुईमूग, कांदा आणि फळबागांसाठी अत्यावश्यक सल्ला! योग्य पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि कीडनियंत्रणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घ्या.

Team Agrowon

Farming Guide:

गहू

अवस्था : पक्वता / दाणे भरणे

लवकर पेरणी केलेल्या गहू पिकाच्या कापणीवेळी दाण्यातील ओलाव्याचे प्रमाण १५ टक्के असावे. कापणी पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी करावी, त्यामुळे गव्हाचे दाणे शेतात झडण्याचा प्रकार टाळता येईल.

उशिरा पेरणी केलेले गहू पिकाच्या पेरणीस ८० ते ८५ दिवस झाले असल्यास दाणे भरण्याच्या अवस्थेत असेल, तर पिकास पाणी द्यावे. या अवस्थेत पाणी दिल्यास चांगले उत्पादन मिळते.

साठवणूक

साठवणीतील धान्याचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी कापणी केलेल्या पिकाच्या धान्यामध्ये ११ ते १२ टक्के, कडधान्ये ९ टक्के, तेलबिया ८ टक्के आणि भाजीपाला बियाणे ५-६ टक्के इतका ओलावा राहील, इतपत बियाणे वाळवून घ्यावे.

उन्हाळी भुईमूग

पिकास फांद्या फुटणे

भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणविरहित ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन खुरपण्या व दोन कोळपण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात. शेवटची कोळपणी थोडी खोल दिल्यास पिकाला मातीची भर मिळते. आऱ्या सुटू लागल्यानंतर (पेरणीनंतर ३५ ते ४० दिवस) आंतरमशागतीची कामे करू नयेत. फक्त मोठी तणे हाताने उपटून टाकावीत. म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल.

चिकू

कळी आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ ईसी) १ मिलि किंवा प्रोफेनोफॉस (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रिन (४ टक्के ईसी) (संयुक्त कीटकनाशक) २ मिलि

आंबा

खोड किडीचे नियंत्रण करण्यासाठी, खोडावरील अळीची छिद्रे शोधून लोखंडी तारेच्या सहाय्याने आतील अळी मारावी. त्यानंतर क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावण छिद्रात ओतावे. अशी छिद्रे चिखलाने बंद करावीत.

वांगी

अंकुर आणि फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणीक्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मिलि किंवा इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ०.३ ग्रॅम किंवा क्लोरॲण्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५ ईसी) १ मिलि.

टोमॅटो/ मिरची

फळ पोखरणाऱ्या अळीच्या पतंगाच्या सर्व्हेक्षण आणि नियंत्रणासाठी लागवडीनंतर २० दिवसांनी प्रति एकरी १६ कामगंध सापळे शेतात उभारावेत.

कांदा

रांगडा हंगामातील कांदा काढणीस तयार झाला असल्यास तीन आठवडे आधी कांद्याचे पाणी बंद करावे.

रब्बी हंगामातील कांदा पीक दोन महिन्यांचे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. पीक स्वच्छ ठेवावे.

फळ पिके

वाढत्या तापमानामुळे फळे व भाजीपाला पिकांमध्ये पाण्याचा ताण पडतो, त्यामुळे कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. तसेच भाज्यामध्ये पांढरी माशी किवा तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे बागेत ताण पडू देऊ नये. किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने कोळीनाशकाची फवारणी करावी.

०२४२६ - २४३२३९

ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, महात्मा फुल कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT