Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला (राहुरी विभाग)

Crop Management : राहुरी विभागतील कृषी सल्ला या लेखातून पाहुयात.

Team Agrowon

Indian Agriculture :

भुईमूग

शेंगा येण्याची अवस्था

भुईमुग पिकाच्या पाण्यासाठी संवेदनशील अवस्थांव्यतिरिक्त जमिनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० दिवसांच्या अंतराने पीक पक्व होईपर्यंत पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

मका

फुलोऱ्यात असताना पिकास अवश्य पाणी द्यावे.

ज्वारी

ओंबी तयार होण्याची अवस्था

ज्वारी पिकावर या काळात खोडकिडीचा प्रादुर्भाव होत असतो. या किडीसाठी पिकाचे सतत निरीक्षण करावे. खोडकिडीचे प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.५ ग्रॅम.

तूर

फांद्या फुटण्याची अवस्था

तूर पिकांवर खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

निंबोळी अर्क (पाच टक्के) किंवा ॲझाडिरेक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि किंवा डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १.५ मिलि.

सोयाबीन

फुलोऱ्यात असताना

स्पोडोप्टेरा अळीचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत.

मूग, उडीद

शेंगा लागण्याची अवस्था

पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी जास्त प्रमाणात आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के एस.जी.) ०.५ ग्रॅम.

कांदा

तापमानातल्या बदलामुळे कांदा पिकावर फुलकिडीचा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी

लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ०.६ मिलि अधिक टेब्युकोनॅझोल १ मिलि अधिक चिकटद्रव्य १ मिलि. (टॅंक्स मिक्स)

कपाशी

पाते लागणे ते फुले उमलणे

पीक तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या व कोळपणी करून साठ दिवसांकरिता पीक तणविरहित ठेवावे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहते.

टोमॅटो

टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्‍लोराइड २.५ ग्रॅम.

पुढील फवारणी १० दिवसांनंतर बुरशीनाशक बदलून करावी.

भोपळा वर्गीय भाजीपाला

पांढरी माशी किंवा कोळी किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीवर आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी

निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा कडुनिंबाचे तेल ५ मिलि किंवा डायफेन्थ्युरॉन (५० डब्ल्यू. पी.) १.२ ग्रॅम.

लिंबूवर्गीय फळझाडे

विविध किडीच्या प्रादुर्भावानुसार नियंत्रणाचे नियोजन करावे. फवारणी प्रमाण ः प्रति लिटर पाणी

फुलकिडीच्या सुरुवातीच्या प्रादुर्भावाच्या टप्प्यावर कडूलिंबाची भुकटी ५० ग्रॅम किंवा कडूनिंब आधारित कीटकनाशक ॲझाडिरॅक्टिन (१० हजार पीपीएम) २ ते ३ मिलि.

पिठ्या ढेकण्याच्या नियंत्रणाकरिता, लेकिनीसिलिअम लेकॅनी (१.१५ टक्के डब्ल्यूपी) ५ ग्रॅम.

कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास डायफेन्थ्युरॉन (५० डब्ल्यूपी) २ ग्रॅम.

: ०२४२६ -२४३२३९

(प्रमुख, कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT