Crop Production Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory: कृषी सल्ला : राहुरी विभाग

Agriculture Update: राहुरी विभागातील शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला आणि मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. विभागात पिकांच्या निगा, योग्य तंत्रज्ञान, आणि जलवापर यावर सखोल चर्चा होऊन शेतकऱ्यांना सल्ला दिला जातो. यामुळे शेतकरी आपल्या पिकांची उत्पादकता वाढवू शकतात.

डॉ. आदिनाथ ताकटे 

Farming Tips:

सुरु ऊस :

- लागवड
- सुरु ऊस लागवड १५ फेब्रुवारी र्यंत पूर्ण केल्यास ऊस उत्पादकता व साखरेचा उतारा चांगला मिळतो.
- आडसाली ऊस लागवडीसाठी को ८६०३२ (नीरा) किंवा को.एम.०२६५ (फुले २६५) या जातींची निवड करावी.

- एक डोळा रोपांपासून (३० ते ४५ दिवस वयाच्या रोपांची) ऊस लागवड करावी. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत ऊस लागणीस ३० ते ४५ दिवसांपर्यंत जोपासण्यासाठी लागणारे पाणी, तण नियंत्रण, खते यांची बचत होते.
- बेण्याद्वारे लागवड करावयाची असल्यास बेणे मळ्यात वाढविलेले ९ ते १० महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि आनुवंशिक दृष्ट्या शुद्ध ऊस बेणे वापरावे.

तूर

- साठवणूक
- साठवणुकीपूर्वी तूर धान्य ५ ते ६ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किंवा कोठीत साठवावे. साठविलेल्या धान्यात कडुनिंबाचा पाला मिसळावा.
- साठवण कोंदट अथवा ओलसर जागेत करू नये.

हरभरा

- घाटे सुटण्याची अवस्था
- ढगाळ हवामानामुळे घाटेअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावीत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन प्रजननास आळा बसतो.
- शेतात १५ ते २० मिटर अंतरावर पक्षिथांबे लावावेत.
- नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्क फवारणी करावी.

उन्हाळी भुईमूग

- पेरणी पूर्वतयारी
- जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पेरणी करता येईल अशा बेताने पेरणीपूर्व ओलित करावे.
- लागवडीसाठी सुधारित वाण : फुले उन्नती, टी.ए.जी. २४, टी.जी. २६, टी.पी.जे. ४१, जे.एल. ५०१.
- उन्हाळी भुईमुगाची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान करावी. परंतु तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त वाढत नाही तो पर्यंत पेरणी करू नये.
- उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.

कांदा

करपा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास,
डायफेनकोनॅझोल (२५ टक्के ईसी) १० मिलि किंवा
टेब्युकोनॅझोल १० मिलि किंवा ॲझोक्सिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनकोनॅझोल (११.४ टक्के) १० मिलि किंवा ॲझोक्सिस्ट्रोबीन (११ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१८.३ टक्के) १० मिलि किंवा प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे बुरशीनाशकांच्या दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

संपर्क : ०२४२६-२४३२३९
(ग्रामीण कृषी मौसम सेवा, आणि प्रमुख, कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT