Agri Expo 2025 Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Expo 2025 : ॲग्री एक्स्पोमध्ये शेतीच्या नव्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, पीक वाणांचा प्रसार आणि इलेक्ट्रिक बैलाचा आकर्षक आविष्कार!

Agricultural Exhibition : ॲग्री एक्स्पो-२५ कृषी प्रदर्शनात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या दालनांमध्ये विविध पिकांचे वाण, जैविक खते तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे.

Team Agrowon

Agriculture Innovation :

Chhatrapati Sambhajinagar News :

कृषी विद्यापीठांच्या दालनाद्वारे पीक वाण, तंत्रज्ञानाचा प्रसार

ॲग्री एक्स्पो-२५ कृषी प्रदर्शनात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या दालनांमध्ये विविध पिकांचे वाण, जैविक खते तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली जात आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दालनात ड्रोनद्वारे फवारणीची मार्गदर्शक तत्त्वे, ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम माहिती व चकली निर्मिती यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे,

बदनापूर (जि. जालना) येथील कृषी संशोधन केंद्राच्या दालनात तुरीचे गोदावरी, (पांढरी), रेणुका (लाल), बीडीएन ७११, बीडीएन ७१६ हे वाण, तसेच बागायती क्षेत्रासाठी व यांत्रिकी पद्धतीने काढणीसाठी परभणी चणा १६ या वाणांबद्दल माहिती दिली जात आहे. विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या दालनात केसर आंबा, सिताफळ, चिंच, चिकू आदींची रोपे, ग्रामप्रिया कोंबडीची अंडी, अझोला, बायोमिक्स आदी घटक सादर केलसे आहेत. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दालनात द्रवरूप जिवाणू खते, कीडनाशके, कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ज्वारी, गहू, सोयाबीन, कपाशी, तूर, करडई, कांदा पिकांचे वाण सादर केले आहेत.

लोह, जस्ताचे अधिक प्रमाण असलेली बाजरी छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या दालनात बाजरी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या जस्त व लोहाचे प्रमाण अधिक असलेले बाजरीचे एएचबी १२००, एएचबी१२६९ हे वाण सादर केले आहेत. त्याचप्रमाणे नाचणी, भगर, राळा, कोद्रा आदी भरधान्यांचे नमुने व जैविक कीडनाशके उपलब्ध करण्यात आली आहेत.

‘इलेक्ट्रिक बैल’ ठरतोय शेतकऱ्यांचे आकर्षण

शेतीत बैल आणि मजूर उपलब्धतेची समस्या उग्र होत असल्यामुळे शेतकरी यंत्रशक्तीच्या पर्यायांचा किती गांभीर्याने विचार करतोय हे ‘अॅग्रो एक्स्पो-२५’मध्ये दिसून येत आहे. प्रदर्शनातील अवजारांच्या दालनामध्ये ‘इलेक्ट्रिक बैल’ शेतकऱ्यांचे आकर्षण ठरला आहे.

नाशिकच्या अंदरसूल भागातील शेतकरी कुटुंबातील तुकाराम सोनवणे हा युवक कृषी पदवीचे शिक्षण घेत असताना शेतीमधील मजूर समस्यांचा बारकाईने अभ्यास करीत होता. शेती मशागतीसाठी बैलांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने या कृषी पदवीधराने चिकाटीने संशोधन करीत ‘इलेक्ट्रिक बैल’ तयार केला आहे. या यंत्राची किंमत पावणेपाच लाखांपर्यंत आहे. छोटा ट्रॅक्टरसारखे दिसणारे हे यंत्र बॅटरीवर चालते. या यंत्राने दोन तासांत एक एकर पेरणी, पाऊण तासात फवारणी आणि दोन तासांत कोळपणी, वखरणीची कामे होतात. इलेक्ट्रिक बैलाबाबत माहिती देताना अभियंता योगेश पदळे म्हणाले, की शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन ‘फोर व्हील’ तंत्रज्ञानावर आधारित नवा इलेक्ट्रिक बैल तयार करण्यासाठी आम्ही संशोधन करीत आहोत.

नितीन गडकरी यांच्या शेतावर इलेक्ट्रिक बैल

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी हे प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. तुकाराम सोनवणे यांनी इलेक्ट्रिक बैल तयार केल्यानंतर आळंदी येथे कारखाना सुरू केला. या बैलाची माहिती त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिल्यानंतर त्यांनी या इलेक्ट्रिक बैलाचा आपल्या शेतात वापर सुरु केला आहे. काकरी करणे, पाळी लावणे, फवारणी आणि पेरणी अशी सर्व कामे हव्या त्या अंतरानुसार झटपट करण्याची क्षमता या यंत्रामध्ये आहे.

आधुनिक तंत्र प्रसारासाठी ॲग्रोवन प्रदर्शन उपयुक्त : डॉ. इंद्र मणी

शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सकाळ-ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक असल्याची प्रतिक्रिया वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली. प्रदर्शनाला त्यांनी शनिवारी (ता. ११) भेट दिली. या वेळी त्यांनी वाल्मी, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प यांच्यासह आत्मा विभाग यांची दालने पाहिली. डॉ. इंद्रमणी म्हणाले,

की विद्यापीठानेही ‘शेतकरी देवो भव’चा नारा दिला आहे. कृषी विस्तारात ‘ॲग्रोवन’चे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी. त्यातून तंत्रज्ञान, विज्ञान समजून घ्यावे. या वेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरिधारी वाघमारे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. एस. बी. पवार, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. के. टी. जाधव, यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र कृषी संशोधन केंद्र राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ कर्मचारी उपस्थिती होते.

यंत्रांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी उत्सुकता

कृषी प्रदर्शनात सूक्ष्मसिंचन व सौरकुंपण यंत्रांची प्रात्यक्षिके मांडण्यात आली आहेत. ती पाहण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मराठवाड्यासह विदर्भातूनही शेतकरी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले आहेत. यात तरुण शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स’कंपनीने प्रदर्शनस्थळी विविध प्रकारच्या सूक्ष्मसिंचन यंत्रणा व उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर केले आहे, यात चार प्रकारचे ड्रीपर्स, फॉगर्स, रेनपोर्ट, पाइप्स यांचे नमुने आहेत.

शेतकरी गरजेनुसार संचांची आगाऊ नोंदणीही करत आहेत. यासोबतच छत्रपती संभाजीनगर येथीलच कोमल सोलार कंपनीचे सौरचलित तार कुंपणाचे (झटका यंत्र) प्रात्यक्षिक पाहण्याची उत्सुकता दिसून येत आहे. हे यंत्र शेतात बसविल्यानंतर रानडुक्कर, वानर, ससे, हरिण, कुत्रे आदी प्राणी व चोरांपासून पिकाचे संरक्षण करता येते. या यंत्राला सेन्सर बसविण्यात आले आहे. साडेतीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत यंत्र उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT