Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Expo 2025 : अॅग्री एक्स्पो २५’ कृषीप्रदर्शनाचे दिमाखदार उद्‌घाटन

Agriculture Exhibition Inaguration : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शनाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने दोन प्रगतिशील शेतकरी दांपत्याच्या हस्ते शुक्रवारी (ता.१०) दिमाखदार उद्‌घाटन झाले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : ‘सकाळ-अॅग्रोवन’च्या भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शनाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने दोन प्रगतिशील शेतकरी दांपत्याच्या हस्ते शुक्रवारी (ता.१०) दिमाखदार उद्‌घाटन झाले. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आधुनिक यंत्रे-अवजारे ते ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारखे नवतंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची दिसलेली उत्सुकता हेच या प्रदर्शनाचे आकर्षण ठरते आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूल जवळील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सोमवारपर्यंत (ता. १३) सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन चालणार आहे. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक अॅग्रिकोन न्यूट्रिटेक हे आहेत. तसेच एन्झोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज, पवन अॅग्रो, पितांबरी अॅग्रो केअर डिव्हिजन, बी. जी. चितळे डेअरी, आत्मा (अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी), मेडा (महाऊर्जा),

एमएआयडीसी या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. याशिवाय रोहित कृषी इंडस्ट्रीज, इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) हे यंदाच्या प्रदर्शनाचे गिफ्ट स्पॉन्सरर्स आहेत. आज पहिल्याच दिवशी मराठवाडा, विदर्भासह अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद प्रदर्शनाला मिळाला. आज अनेक शेतकऱ्यांनी अवजारे, यंत्राची खरेदी केली; तर काहींनी नोंदणी केली.

राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेले शेतकरी लक्ष्मण आहेर व सौ. सरिता लक्ष्मण आहेर (टोणगाव, ता.जि. छत्रपती संभाजीनगर) आणि लाडसावंगी येथील उद्यानपंडित शेतकरी बाबासाहेब पडुळ आणि सौ. ज्योती बाबासाहेब पडुळ या शेतकरी दांपत्यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनाचे अनोखे उद्‌घाटन झाले. या वेळी मुख्य प्रायोजक ॲग्रिकोन न्यूट्रिटेक लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर नरेंद्र घेलानी, बिझनेस हेड (महाराष्ट्र) कृष्णा साळवे, प्रदर्शनाचे सहप्रायोजक चितळे डेअरी भिलवडी सांगलीचे मराठवाडा विभाग मुख्य वितरक सतीश कुलकर्णी,

मराठवाडा विक्री अधिकारी प्रवीण काळे, जीवन साळुंखे, एन्जोकेम ॲग्रो केमिकलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत कोटमे, पवन अॅग्रोचे विक्री अधिकारी गणेश नागरे, पितांबरी प्रॉडक्ट्सचे अॅग्री केअर डिव्हिजनचे बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर प्रसाद गोसावी, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे, छत्रपती संभाजीनगर येथील आत्माच्या प्रकल्प संचालिका धनश्री जाधव,

‘महाऊर्जा’चे विभागीय व्यवस्थापक नीलेश जगताप, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे, ‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीचे संपादक संतोष शाळिग्राम व युनिट हेड संजय चिकटे, ‘अॅग्रोवन’चे निवासी संपादक रमेश जाधव, उपसरव्यवस्थापक (बिझनेस) बाळासाहेब खवले, सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती या वेळी होती.

२२ हजारांचा छोटा हायड्रोलिक वखरपासून ते १७४ अश्‍वशक्तीचे भव्य ऊस तोडणी यंत्र या ठिकाणी बघण्यास मिळते. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी अवजारांच्या विविध दालनांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. ड्रोन, इलेक्ट्रिक बैल, स्वयंचलित टोकन यंत्र, मोठे नांगर, हार्वेस्टर, ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, थ्रेशर, फवारणी यंत्रे, सौर यंत्रे, कडबाकुट्टी यंत्र तसेच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची दालने शेतकरी उत्सुकतेने बघत होते.

उद्‌घाटक शेतकरी भारावले

‘सकाळ-अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाचा मान मिळालेले दोघेही शेतकरी भारावून गेले होते. उद्‌घाटक शेतकरी लक्ष्मण आहेर म्हणाले, ‘‘या प्रदर्शनाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होतोच; पण शेतकऱ्यांच्या ज्ञानाच्या कक्षाही रुंदावतात. मी दरवर्षी ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनाला येतो. यंदा मात्र मला उद्‌घाटनाची संधी मिळाल्याने मी भारावून गेलो आहे.’’

दुसरे उद्‌घाटक शेतकरी बाबासाहेब पडूळ म्हणाले, ‘‘मजुरांच्या समस्येमुळे शेती व्यवसाय बिकट होत असून, यांत्रिकीकरण हाच त्यावर उपाय असल्याचा संदेश या प्रदर्शनातून मिळतो आहे. प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाचा मला मिळालेला मान म्हणजे माझ्या सर्व शेतकरी बांधवांचा सन्मानच आहे.’’

विजय वहाडणे ठरले ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्र विजेते

कृषी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना दररोज सोडतीद्वारे रोहित कृषी इंडस्ट्रीजकडून पेरणी यंत्र देण्यात येणार आहे, शुक्रवारी पहिल्या दिवशी विजय गोधाजी वहाडणे (मु.पो. राहाता, जि. अहिल्यानगर) यांना हे यंत्र जाहीर करण्यात आले. कृषी प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक अॅग्रिकोन न्यूट्रिटेक लिमिटेडचे महाराष्ट्राचे बिझनेस हेड कृष्णा साळवे आणि गिफ्ट प्रायोजक रोहित कृषी इंडस्ट्रीजचे मराठवाडा विभागाचे मुख्य वितरक अजय गांधी, यश गांधी, व्यवस्थापक श्रीधर गायकवाड, मार्केटिंग अधिकारी श्रीराम गोरे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT