Palghar News : शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या अनेक योजनांच्या माध्यमातून कृषी विभाग प्रत्यक्षपणे बांधावर जाऊन काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे सांगत वॉटर शेड यात्रेच्या निमित्ताने मृदा आणि जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे. यापुढे वृक्षतोड थांबवू आणि जंगलाचे संवर्धन करून पर्यावरण रक्षणासाठी काम करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत आमदार विलास तरे यांनी व्यक्त केले.
कृषी विभागाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजना अंतर्गत सुरू असलेल्या वॉटर शेड रथयात्रेचे महामार्गावरील दुर्वेस आणि बोट गावात उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यात्रेच्या निमित्ताने दोन्ही गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुर्वेस गावात आमदार विलास तरे यांच्या उपस्थितीत वॉटर शेड यात्रेचे स्वागत करण्यात आले.
या वेळी ते बोलत होते. प्रभात फेरीच्या माध्यमातून गावामध्ये मृदा आणि जलसंधारण कामांबाबत जनजागृती करण्यात आली. यात्रेनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
या वेळी दुर्वेस ग्रामपंचायतीचे सरपंच सागर कडव, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी पंढरीनाथ सासे, मंडळ कृषी अधिकारी अजय हुले, कृषी पर्यवेक्षक गुरुनाथ माळगावी, कृषी सहाय्यक, दुर्वेस शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
पाणी आणि माती हीच खरी संपत्ती!
पाणी आणि मातीचे संरक्षण करणे शेतकरी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आगामी पिढीच्या हाती या खऱ्या संपत्तीचे हस्तांतरण केले पाहिजे, असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदेश सातवी यांनी व्यक्त केले.
या वेळी हालोली बोट ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश सांबरे, ग्रामविकास अधिकारी पद्मा भांगरे, मंडळ कृषी अधिकारी अजय हुले, कृषी पर्यवेक्षिका जान्हवी पारधी, साईबाबा विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बोट गावामध्ये विविध कार्यक्रम
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत आयोजित वॉटर शेड यात्रेच्या निमित्ताने बोट गावात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी मृदा व जलसंधारणाची जनजागृती केली जात आहे. या यात्रेनिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.