Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agri Assistant Protest : कृषी सहायकांच्या मागण्या मान्य न झाल्यास कामकाजावर बहिष्कार

Agriculture Department : कृषी सहायकांचे विविध प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवावेत, अन्यथा यंदाच्या खरीप हंगामातील कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कृषी सहायक संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Team Agrowon

Kolhapur News : कृषी सहायकांचे विविध प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवावेत, अन्यथा यंदाच्या खरीप हंगामातील कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कृषी सहायक संघटनेच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे व कृषी संचालक नामदेव परीट यांना देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष माधुरी निकम यांनी सांगितले, की कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहायक पदावर नियुक्ती देण्यात यावी. कृषी सहायकांचे पदनाम बदलून सहायक कृषी अधिकारी करणे कृषी विभागामधील संपूर्ण कामकाज डिजिटल स्वरूपात होत असतांनाही कृषी सहायकांना लॅपटॉप दिला जात नाही. कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस घेणे

निविष्ठा वाटपासंदर्भात वारंवार निवेदन देवून सुद्धा त्यामध्ये सुसूत्रता येत नसून, कृषी सहाय्यकांना वाहतूक भाड्यापोटी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. तरी मार्गदर्शक सुचनेमध्ये विविध योजनेत कृषी सहाय्यक यांना वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा निविष्ठा वाटप परमिटद्वारे करावे.

कृषी विभागाचा आकृतीबंधास तत्काळ मंजुरी द्यावी व त्यामध्ये कृषी पर्यवेक्षक यांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील कुंटितावस्था दूर करावी व महसूल विभागाप्रमाणे आकृतिबंध करावा, कृषी सहायक कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४ : १ या प्रमाणे करावे. यासह विविध मागण्या आम्ही केल्या आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास पाच मेपासून विविध टप्प्यावर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असे निकम यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Crop Damage: अमरावती विभागात तीन लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान

Pune Rain Update: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर, धरणांतून विसर्गात वाढ

Fertilizers Shortage: सरळ, मिश्र खतांच्या टंचाईमुळे विद्राव्य खतांच्या वापरात वाढ

Vidarbha Rain Alert: पश्चिम विदर्भात पावसाने मांडले ठाण

MPKV Vice Chancellor: महात्मा फुले विद्यापीठासाठी नव्या कुलगुरूंचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT